नागालँड : चीन बरोबर चर्चा सुरु असताना लष्कर सीमेवरदेखील तयार आहे, अशी माहिती लष्करप्रमुख एम.एम. नरवणे (General Manoj Naravane) यांनी दिली आहे. उत्तर आणि पश्चिम सीमेवर चांगल्या घडामोडी घडत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून उत्तर आणि पश्चिम सीमेवर चांगल्या घडामोडी घडत आहेत. आज सकाळी चीनच्या बाजूने चुशुल-मोल्डोवर कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची 14 वी फेरी पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (General Manoj Naravane On Indo China Talk)
भारताच्या उत्तर सीमेवरील परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय योजण्यात आल्या आहेत. अंशत: सैन्याने माघार घेतली आहे, परंतु धोका कोणत्याही प्रकारे कमी झालेला नसल्याचे नरवणे यांनी यावेळी सांगितले. चिनी पीएलएशी वाटाघाटी करत असतानाही आम्ही आमच्या ऑपरेशनल तयारीची सर्वोच्च पातळी कायम ठेवली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नागालँड घटनेची चौकशी सुरूः लष्करप्रमुख
नागालँडमधील (Nagaland Incident Thoroughly Investigated) ओटिंग येथे ४ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे लष्करप्रमुख म्हणाले. ऑपरेशन दरम्यानही आम्ही आमच्या देशवासीयांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचे नरवणे यांनी सांगितले. लष्करप्रमुख म्हणाले की, पश्चिम आघाडीवरील विविध लॉन्च पॅडवर दहशतवाद्यांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि नियंत्रण रेषेवर वारंवार घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. यातून आपल्या पाश्चात्य शेजाऱ्यांच्या नापाक मनसुबे पुन्हा एकदा समोर येत आहेत.
पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास
लष्करप्रमुख पुढे म्हणाले की, पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास केला जात आहे. रस्ते आणि पूल बांधले जात आहेत. नागरिकांसाठी तयार पायाभूत सुविधांचा दुहेरी वापर होत आहे. चीनबाबत ते म्हणाले की, अजूनही धोका कमी झालेला नाही आणि आमच्याकडून सैन्याची संख्या वाढवण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.