टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. खून आणि आत्महत्या या दोन्ही एँगलने पोलिस तपास करणार आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. तुनिषाने आत्महत्या केली त्यावेळी सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाची चौकशी पोलिस करीत आहेत वालीव पोलिसांनी एएनआयला यासंबंधी माहिती दिली.
दिशा सालियन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. सीबीआय कडे हे प्रकरण कधीही सोपवण्यात आलेलं नाही. त्यामुळे सीबीआयने कुठलाही तपास केला नाही. दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे सीबीआयने म्हंटलय.
अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये मुख्य भूमिका निभावलेली टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
खासदार अरविंद सावंत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. खासदार सावंत म्हणाले की, खोके आणि सत्ता यापलीकडे या सरकारला काय पडलेलं नाही. एसआयटी लावून एखाद्याच राजकीय करियर कस संपवायचं एवढाच यांना माहिती आहे. 75 वर्षात जे झालं नाही ते आता काय होत आहे अशा शब्दात सावंत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भारत जोडो यात्रेत कमल हसन सामिल झाले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून भारत जोडो यात्रा पुढे जात असताना अभिनेता कमल हसन यामध्ये सामील झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की माझे वडिल काँग्रेसमध्ये होते. बरेच लोक मला विचारतात की मी इथे का आलो आहे. मी एक भारतीय म्हणून इथे आलो आहे. असंही ते यावेळी म्हणलेत.
भारत जोडो यात्रेत कमल हसन सामिल झाले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून भारत जोडो यात्रा पुढे जात असताना अभिनेता कमल हसन यामध्ये सामील झाले आहेत.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चीनमध्ये हाहाकार उडाला आहे. अशातच राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून राज्यातील जनतेचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची टक्केवारी 95 टक्के आहे. बूस्टर डोस सुद्धा 70 टक्के लोकांनी घेतला आहे. त्यातही महाराष्ट्रातील नागरिकांची इम्युनिटी इतर देशांच्या तुलनेत जास्त असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली होती. सीबीआयने ही कारवाई कथित कर्ज फसवणूक प्रकरणात केलेली आहे. चंदा कोचर ह्या सीईओ असतांना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन ग्रुपला ३ हजार २५० कोटींचं कर्ज दिल्याचा आरोप आहे. शिवाय त्यांच्यावर अनिमिततेचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्यासंबधी आज चंदा कोचर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोरोना महामारीच्या नवीन लाटेचा सामना करण्यासाठी वैद्यकीय ऑक्सिजनचा नियमित पुरवठा त्वरित सुनिश्चित करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आज एका पत्राद्वारे केली आहे. शासकीय तसेच खासगी रूग्णालयांतील ऑक्सिजन संयंत्रे पूर्णपणे कार्यरत ठेवावीत आणि त्यांच्या तपासण्यासाठी नियमित ‘मॉक ड्रील' आयोजित करण्यात यावे, असेही पत्रात म्हटले आहे.
संजय राऊत स्वत: भूखंड घोटाळ्यासाठी १०० दिवस तुरूंगात होते. असं म्हणत लाड यांनी राऊतांवर निशाना साधला आहे.
डॉ. संजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविशील्ड आणि कोर्बावॅक्स लसींचा साठा उपलब्ध नसून कोवॅक्सिनचे फक्त सहा हजार मात्रा शिल्लक आहेत. त्यामुळे आता सामन्य नागरिकांना लस कधी मिळणार हे सांगता येत नाही.
राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन अमरावतीच्या वतीने राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत.
देशात कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएन्ट BF7 संक्रमित झाला असल्याने शासनाकडून आता खबरदारीचा इशारा म्हणून दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली आहे. आता तुळजापुरमधील तुळजाभवानी मंदिर संस्थानानेही मास्क सक्ती केली आहे. असे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
भाजपचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भिषण अपघात झाला. या अपघातात गोरे थोडक्यात बचावले आहेत. या अपघातात चारजण जखमी झाले आहेत. गोरे आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांना किरकोळ मार लागला आहे.
डॉ. कपिल झिरपे, रूबी हॉस्पिटल
सकाळी सहा वाजता त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण टीमने तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.
सुदैवाने त्यांना जास्ती दुखापत नाहीये ते शुद्धीवर आहेत आणि बोलत देखील आहेत.
जयकुमार गोरे यांना कुठलीही मोठी दुखापत नाही.
त्यांचे पल्स आणि बीपी व्यवस्थित आहे.
त्यांच्या छातीला थोडासा मार लागला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.