मोदी सरकार करणार नेहरू संग्रहालयाचे नामांतर

Naming of the Nehru Museum
Naming of the Nehru MuseumNaming of the Nehru Museum
Updated on

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नेहरू संग्रहालयाचे नामांतर (Nehru Museum) करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते पीएम म्युझियम म्हणून ओळखले जाईल. येथे देशाच्या १४ माजी पंतप्रधानांच्या आठवणी जतन केल्या जातील. आंबेडकर जयंती म्हणजेच १४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एनडीए सरकारने १४ माजी पंतप्रधानांच्या योगदानाची कबुली देण्यासाठी ही पावले उचलली आहेत. पंतप्रधान संग्रहालयात सर्व माजी पंतप्रधानांच्या कार्यांचे प्रदर्शन केले जाते. त्यांच्या सरकारने सर्व पंतप्रधानांच्या योगदानाची दखल घेतली आहे, असे पीएम मोदींनी आज भाजप खासदारांना बैठकीत सांगितले.

Naming of the Nehru Museum
केजरीवालांबद्दल अपमानास्पद वक्तव्य; आपचे आमदार म्हणाले...

मोदींनी भाजप (BJP) खासदारांना बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाला भेट देण्यास सांगितले. बीआर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी राष्ट्रीय राजधानीत बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राष्ट्रीय भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा हे आज नवी दिल्लीतील आंबेडकर केंद्रात पार्लमेंटरी पार्टीच्या बैठकीत उपस्थित होते.

भाजप स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिलपासून भाजपतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या स्थापना दिवसापासून ते १४ एप्रिलपर्यंत म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. बैठकीदरम्यान भाजप खासदारांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणखी सहा महिन्यांसाठी वाढवल्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन आणि आभार मानण्याचा ठरावही मंजूर केला.

Naming of the Nehru Museum
काँग्रेस नेते म्हणाले, गडकरींनी मोदींशी चर्चा केल्यास हिताचे होईल

सहा महिन्यांसाठी मुदतवाढ

केंद्र सरकारने शनिवारी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ दिली. आता सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रत्येक लाभार्थ्याला अन्नधान्याच्या सामान्य कोट्याव्यतिरिक्त दरमहा अतिरिक्त पाच किलो मोफत रेशन मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()