‘नमो घाट’ठरणार पर्यटकांचे आकर्षण

वाराणसीत लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन
Namo Ghat tourist
Namo Ghat tourist sakal
Updated on

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशातील वाराणसीतील ‘नमो घाट’चे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. या घाटाचे लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन होण्याची शक्यता आहे. ‘खिडकिया घाट’ असे नाव असलेल्या या घाटाला नमस्काराच्या मुद्रेतील तीन मोठ्या शिल्पांमुळे घाटाला ‘नमो घाट’ असे नाव मिळाले आहे.

हा वाराणसीतील ८५ वा घाट ठरेल. घाट आधुनिक काळाशी सुसंगत बनवितानाच त्याला पारंपरिक रुप देण्याचाही प्रयत्न केला आहे. घाटावरील नमस्काराच्या मुद्रेतील तीन शिल्पे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी सूर्याला अभिवादन करणारी दोन शिल्पे सुमारे २५ फूट उंचीची आहेत तर तिसरे शिल्प १५ फूट उंच असून ते गंगा नदीला अभिवादन करते. या तीन शिल्पांशिवाय घाटावर ७५ फुटांचे धातूचे शिल्प उभारण्याचाही प्रस्ताव आहे. वाराणसी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ.डी.वासुदेवन म्हणाले की हा घाट सुमारे मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि स्थानिक गोष्टींना उत्तेजन देण्याच्या ‘व्होकल फॉर लोकल’ संकल्पनेतून घाट साकारण्यात येत आहे. या घाटावरून पर्यटकांना सुबह-ए-बनारसचे दृश्य पाहता येईल.

‘नमो घाटा’ची वैशिष्ट्ये

  • वाचनालय, खुले प्रेक्षागृह, बनारसी पद्धतीचे भोजनालय, हेलिपॅड

  • दिव्यांग, वृद्धांसाठी रॅम्पची सोय

  • गंगा आरतीचेही आयोजन

  • काशी विश्वनाथ धामलाही जाता येणार

पर्यटकांना ‘नमो घाटा’वरून नौकेने श्री काशी विश्वनाथ धाम मंदिरातही जाता येईल. त्यासाठी घाटावरील ‘सुगम दर्शन’ वरुन तिकीट काढण्याचीही सोय असेल. गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी घाटावर सीएनजी बोटींसाठी तरंगते सीएनजी स्थानकही बांधले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.