कर्नाटकात दूध उत्पादनात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दैनंदिन सरासरी ९० लाख लिटर उत्पादन वाढून ते सरासरी ९९ लाख लिटर झाले आहे.
बंगळूर : कर्नाटक दूध महामंडळाने (Karnataka Milk Corporation) ५० मिली अतिरिक्त दूध देत नंदिनी दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. आज (ता. २६) पासून ही दरवाढ लागू होणार आहे. मात्र, नंदिनी दुधाच्या (Nandini Milk) दरात वाढ न केल्याची माहिती केएमएफचे अध्यक्ष भीमा नायक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘एक लिटर दुधाच्या पिशवीत ५० मिली अधिक दूध देण्यात येणार आहे. अधिकच्या ५० मिलिलिटर दुधाची किंमत दोन रुपये १० पैसे होते. अर्धा व एक लिटर नंदिनी दुधाच्या पॅकेटमध्ये अतिरिक्त ५० मिली दूध अतिरिक्त मिळणार आहे. दुधाच्या दरात प्रत्यक्ष वाढ झालेली नाही. सध्या नंदिनी ब्लू पॅकेट दुधाची किंमत ४२ रुपये आहे. त्यामुळे आजपासून ते ४४ रुपये होईल.
अर्धा लिटर दुधाची किंमत २२ रुपयांवरून २४ रुपये होईल. अर्धा लिटर दुधाच्या पाकीटातही ५० मिली अधिक दूध मिळेल. दही आणि इतर उत्पादनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. सर्व दूध संघांमध्ये दुधाचा साठा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याचा साठा एक कोटी लिटरच्या जवळपास आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना एक लिटर व अर्धा लिटर पाकिटात ५० मिली अतिरिक्त दूध देण्याचे ठरले आणि या अतिरिक्त दुधाची किंमत म्हणून दोन रुपयांनी वाढ केली आहे.
ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे. महामंडळाकडे जुन्या किमतीच्या छापील दुधाच्या पाकिटांचा साठा असून जोपर्यंत हा साठा संपत नाही, तोपर्यंत जुन्याच छापील पाकिटांमध्ये दुधाचा पुरवठा केला जाईल. यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे.’’ यावेळी केएमएफचे व्यवस्थापकीय संचालक एन. के. जगदीश, पणन संचालक रघुनंदन, संचालक वीरभद्रबाबू, भरमण्णवर आदी उपस्थित होते.
बंगळूर : दुधाचे उत्पादन वाढल्याने नंदिनी दुधाचे प्रति पॅकेटमध्ये ५० मिलीलीटर दूध देण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जादा दुधासाठी दोन रुपये दर ठरवला आहे. मात्र, दुधाच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याचे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘अर्धा लिटर दुधाच्या पॅकेटमध्ये ५५० मिली आणि एका लिटरच्या पॅकेटमध्ये १,०५० मिली दूध मिळणार आहे. दूध संकलन केंद्रांमध्ये शेतकऱ्यांनी आणलेले अतिरिक्त दूध कोणत्याही कारणाने नाकारू नये, या चांगल्या हेतूने केएमएफ संघटनेने पॅकेटमधील दुधाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी कर्नाटकात दूध उत्पादनात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दैनंदिन सरासरी ९० लाख लिटर उत्पादन वाढून ते सरासरी ९९ लाख लिटर झाले आहे. अशाप्रकारे उत्पादित अतिरिक्त दूध शेतकऱ्यांकडून खरेदी केले पाहिजे. आतापर्यंत एक हजार मिली दुधाची किंमत ४२ रुपये आणि ५०० मिली दुधाची किंमत २२ रुपये होती. यापुढे १,०५० मिली आणि ५५० मिली दुधाची पाकिटे अनुक्रमे ४४ आणि २४ रुपये दराने विकली जातील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.