Milk Federation : निवडणुकीदरम्यान वादात सापडलेल्या 'या' दूध दरात होणार वाढ; महासंघानं घेतला मोठा निर्णय

कर्नाटक दूध संघाकडून दरवाढीची विनंती यापूर्वीच मिळाली आहे.
Karnataka Milk Federation Nandini Milk
Karnataka Milk Federation Nandini Milkesakal
Updated on
Summary

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या हिताबाबत चर्चा होणार आहे.

बंगळूर : कर्नाटक दूध महासंघाने (Karnataka Milk Federation) सरकारला नंदिनी दूधाच्या दरात पाच रुपयांनी वाढ करण्याची विनंती केली आहे. केएमएफचे नूतन अध्यक्ष भीमा नाईक म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीत वाढ करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘नंदिनी दूध (Nandini Milk) हा राष्ट्रीय ब्रँड आहे. खासगी क्षेत्राला स्पर्धा देण्याची ताकद केएमएफमध्ये आहे. दूध कमी झाले आहे. तुपाचा तुटवडा आहे. दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.

Karnataka Milk Federation Nandini Milk
Karad : वाद चिघळणार! राड्यानंतर दोन्ही राजे उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला; फडणवीस कोणता घेणार निर्णय?

कर्नाटक दूध संघाकडून दरवाढीची विनंती यापूर्वीच मिळाली आहे. शेतकऱ्यांना (Farmer) पाच रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. त्यात आणखी दोन रुपयांची वाढ करण्याचा विचार आहे. त्यामुळे नंदिनी दुधाच्या दरात प्रतिलिटर पाच रुपये वाढ करण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या हिताबाबत चर्चा होणार आहे. याशिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळावा, यासाठी त्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करणे गरजेचे आहे. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या दुधाच्या दरातही वाढ करणे आवश्यक आहे.

Karnataka Milk Federation Nandini Milk
Devendra Fadnavis : उदयनराजे-शिवेंद्रराजे वादावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, तिथं गंभीर घडलं असं..

सहकार मंत्री राजण्णा यांनी दूधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. केएमएफच्या नंदिनी दूधाचे अमूलमध्ये विलीनीकरण होणार का, या प्रश्नावर मंत्री राजण्णा म्हणाले, ‘‘कोणत्याही विलीनीकरणाचा प्रश्नच येत नाही.

Karnataka Milk Federation Nandini Milk
Monsoon Update : येत्या काही तासांत मॉन्सून कोकणात धडकणार; हवामान विभागाची महत्वाची अपटेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()