Narada Scam- ममतांना CBI चा दणका, 2 मंत्र्यांना अटक

Mamata Banerjee
Mamata Banerjee
Updated on
Summary

मुख्यमंत्री बनललेल्या ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) आता जोरदार धक्का बसला आहे. आता राज्यात ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय (CBI) असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या (West bengal) विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं (TMC) एकहाती बहुमत मिळवलं. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री बनललेल्या ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) आता जोरदार धक्का बसला आहे. आता राज्यात ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय (CBI) असा वाद पेटण्याची शक्यता आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेनं (सीबीआय) चार मंत्र्यांना अटक केली आहे. सीबीआयने Narada Sting Operation प्रकरणी तृणमूलचे मंत्री फिरहाद हाकीम यांच्यासह सुब्रम मुखर्जी, मदन मित्रा आणि सोव्हान चॅटर्जी यांना चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात आणलं आहे. सोवन चॅटर्जी हे माजी महापौर आहेत. दरम्यान, नेत्यांना अटक केल्यानंतर काही वेळातच ममता बॅनर्जीसुद्धा सीबीआय कार्यालयात पोहोचल्या. (Narada Scam 2 minister arrested by cbi in west bengal)

तृमणूल काँग्रेसच्या सरकारमधील मंत्री फिरहाद हाकिम यांची मुलगी प्रियदर्शनी यांना ईडीने नोटीस पाठवली होती. प्रियदर्शनी यांच्या बँक खात्यावर व्यवहारांमध्ये अनियमितता असल्यानं नोटीस पाठवण्यात आल्याचं सांगितलं होतं. याबाबत चौकशीसाठी ईडीने नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं.

Mamata Banerjee
मोदी सरकारवर नाराज; टास्क फोर्सच्या प्रमुखांचा राजीनामा

सीबीआय कार्यालयात असलेले वकील अनिंदो राउत यांनी सांगितलं की, ''ममता बॅनर्जी अधिकाऱ्यांना असा काही नियम नसल्याचं म्हणाल्या. विधानसभा अध्यक्ष आणि राज्य सरकारच्या परवानगीशिवाय तुम्ही कोणत्याही मंत्र्याला अटक करू शकत नाही. जर तुम्ही माझ्या अधिकाऱ्यांना अटक करताय तर मलाही अटक करावी लागेल असं ममतांनी म्हटलं आहे.''

कोळसा चोरी प्रकरणी ममता बॅनर्जी यांची सून आणि खासदार अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीलासुद्धा सीबीआयने नोटीस पाठवली होती. आता सीबीआय कार्यालयात ममता बॅनर्जी समर्थकांसह दाखल झाल्या आहेत.

काय आहे नारदा प्रकरण?

नारदा स्टिंग ऑपरेशनमधील घोटाळा हा 2016 च्या विधानसभा निवडणुकीवेळचा आहे. निवडणुकी आधी नारदा स्टिंग टेप प्रसारीत करण्यात आली होती. यामध्ये तृणमूलचे मंत्री, खासदार आणि आमदार हे खोट्या कंपनीच्या लोकांकडून पैसे घेत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. हे स्टिंग ऑपरेशन 2014 मध्ये करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.