हैदराबाद - ‘माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव (PV Narasimha Rao) हे राजकारणातील खरे संन्यासी (Political Ascetic) होते. या दुर्मिळ विद्वत्तासंपन्न राजकारण्याने देशाच्या आर्थिक आणि परराष्ट्रधोरणाला एक वेगळी दिशा दिली.’ असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (Dr Manmohan Singh) यांनी आज केले. नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. सिंग बोलत होते. (Narasimha Rao is a True Political Ascetic)
तेलंगण काँग्रेसकडून या विशेष व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नरसिंहराव यांच्या कार्यकाळामध्ये अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांना प्रारंभ झाला. भारताची वैशिष्ट्यपूर्ण वास्तविक स्थिती त्यांना माहिती होती, याचा विचार करूनच त्यांनी धोरण आखले होते, असेही सिंग यांनी नमूद केले. नरसिंहराव यांनी वास्तववाद देशाच्या परराष्ट्रधोरणाच्या केंद्रस्थानी आणत शेजारी देशांसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. देशाचे ‘पूर्वेकडे पाहा’ हे धोरण त्याचीच फलनिष्पत्ती होती. देशी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम देखील राव यांच्याच कार्यकाळात सुरू झाला.
देशातील आघाडीचे ह्रदयरोगतज्ज्ञ आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे (पीएचएफआय) अध्यक्ष के.श्रीनाथ रेड्डी यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कधीकाळी रेड्डी यांनी राव यांचे वैयक्तिक डॉक्टर म्हणून काम केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.