नारायण राणेंचं मानसिक संतुलन बिघडलंय - शिवसेना

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सुनावलं
narayan rane
narayan ranesakal
Updated on

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray) यांच्या कानाखाली चढवण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून, असं वक्तव्य करणाऱ्यांचे हात छाटण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे हे त्यांनी विसरु नये, अशा शब्दांत त्यांनी राणेंवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले. यावरूनच केंद्रीय मंत्री नारायण राणेंची महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जीभ घसरली. ते म्हणाले, ''ज्यांना स्वातंत्रदिन कधी आहे हे माहिती नाही त्यांच्याबद्दल बोलणार नाही. स्वातंत्र्यदिन माहित नसलेल्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये. त्यांनी अपशगुन्यांसारखं बोलू नये. त्यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेवून बोलावे. स्वातंत्र्याचा हिरकमहोत्सव काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. हे काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देशाच्या स्वतंत्र्यदिनाच्या माहिती नसावी"

narayan rane
'मी असतो तर कानाखालीच चढवली असती', राणेंची जीभ घसरली

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर तिखट शब्दांत पहिल्यांदा टिका केलेली नाही. गेल्या पंधरा दिवसांत त्यांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे आता केलेल्या या टीकेनंतर शिवसेनेनंही राणेंच्या विधानावरुन त्यांना सुनावलं आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले, "स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चाटुगिरीची सवय लागलेल्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन बिघडल आहे. इथे महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांबद्दल असं वक्तव्य करण्याऐवजी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या अंत्यसंस्कारावेळी तिरंग्यावर ज्या नतद्रष्ट्यानं भाजपचा झेंडा ठेवला होता त्यांचे आधी हात छाटावेत आणि नंतर महाराष्ट्रात येऊन अशी वायफळ बडबड करावी. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, माननीय उद्धवजी ठाकरे किंवा इतर शिवसेना नेते असतील यांच्याबद्दल असं वक्तव्य करणाऱ्यांचे हात छाटण्याची ताकद आम्हा मावळ्यांमध्ये आहे. हे त्यांनी कदापी विसरता कामा नये."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.