Narayan Rane: सभागृहात इंग्रजीत विचारला प्रश्न, राणेंनी दिलं भलतंच उत्तर! दमानियांचा खोचक टोला; म्हणाल्या, "बॉसचा वरदहस्त..."

राज्यसभेत चर्चेदरम्यान राणेंना त्यांच्या खात्यासंदर्भात एक प्रश्न इंग्रजीतून विचारण्यात आला होता.
narayan rane
narayan rane
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेत भाजप खासदार कार्तिकेय शर्मा यांनी इंग्रजीत त्यांच्या खात्यासंबंधीचा एक प्रश्न विचारला. पण राणेंना प्रश्न कळला नाही त्यामुळं ते गडबडले आणि त्यांनी भलतच उत्तर दिलं, याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील शेअर केला असून त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. (narayan rane question asked in english at rajya sabha gave wrong answer anjali damaniyas target him)

narayan rane
Viksit Bharat, Viksit Goa: मोदींनी मांडलं विकसित गोव्याचं व्हिजन; ख्रिश्चन समुदयाचा उल्लेख करत म्हणाले, एक भारत...

व्हिडिओत नेमकं काय?

नारायण राणे यांना खासदार कार्तिकेय शर्मा यांनी प्रश्न विचारला की ’MSME क्षेत्रात कामगार कल्याणासाठी काय पावलं उचलणार?’ पण राणेंना नेमकं काय विचारलंय हेच कळलं नाही. त्यामुळं त्यांची काहीशी गडबड झाली आणि त्यांनी उत्तर देताना म्हटलं की, "MSME क्षेत्राला चालणा देण्यासाठी आपण काय काय केलं याची यादी त्यांनी सभापतींच्या परवानगीनं वाचून दाखवू इच्छितो" (Marathi Tajya Batmya)

narayan rane
Rahul Gandhi: राहुल गांधींनी कुत्र्याने नाकारलेली बिस्किटं कार्यकर्त्याला दिली? व्हिडिओ शेअर करत भाजपचा आरोप

पण राणेंनी प्रश्नाचं नेमकं उत्तर सोडून आपल्या खात्याची माहिती द्यायला सुरुवात केल्यानं विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी मागणी त्यांनी केली. यानंतर सभापतींनी त्यांना प्रश्न नेमका काय आहे? हे पुन्हा एकदा हिंदीतून समाजावून सांगितलं. त्यावर राणे म्हणाले की, "मी वाचून दाखवतो आहे ते उद्योग सुरु झाल्यानंतर कामगारांचे प्रश्न सुटणार आहेत. फॅक्टरीज जर बंद राहिल्या तर कामगारांचे प्रश्न सुटणार आहेत का?" (Latest Marathi News)

narayan rane
Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी, सेन्सेक्स 454 अंकांच्या वाढीसह बंद; कोणते शेअर्स तेजीत?

दमानिया यांची टीका

दरम्यान, अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर करत ज्यांना प्रश्न देखील कळत नाही ते MSME ना काय दिशा व चालना देणार? असा सवाल केला. तसेच नुसती दादागिरी चालत नाही राजकारणात आणि बॉसचा वरदहस्त फार काळ चालत नाही, अशा शब्दांत राणेंना टोमणाही लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.