Loksabha Election Result 2024: देशात पुन्हा मोदी 3.0? इंडिया आघाडी मोठा डाव टाकणार?

Loksabha Election Result 2024: लोकसभा निवडणूक निकालानंतर आता देशात कोणाचे सरकार स्थापन होणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीकडून सरकार स्थापन करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
Loksabha Election Result 2024
Loksabha Election Result 2024Esakal

लोकसभा निवडणूक निकालानंतर आता देशात कोणाचे सरकार स्थापन होणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीकडून सरकार स्थापन करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. अशामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. नरेंद्र मोदी आजच सत्ता स्थापनेसाठी दावा करणार असल्याचं वृत्त साम टीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

मित्रपक्षांसोबतच्या बैठकीत भाजप हा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोदी सरकारचा ८ जूनला शपथविधी होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज राजधानी दिल्लीत काय घडामोडी घडताहेत आणि पुढे काय राजकीय हालचाली होतील, याविषयीच जाणून घेऊयात या व्हिडिओतून..

Loksabha Election Result 2024
Palghar Lok Sabha Election Result : पालघरच्या ग्रामीण भागात आघाडीत बिघाडी! मतांच्या आकडेवारीने केली पोलखोल

लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला आहे. २०१४, २०१९ पेक्षा यंदा मात्र निकाल थोडासा वेगळा लागला आहे. म्हणजे एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी भाजपला एकहाती सत्ता स्थापन करता येणार नाही. २०१९ साली भाजपला देशभरात ३०३ जागा मिळाल्या होत्या. पण यंदा त्यांना ६३ जागांचा फटका बसला आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा जरी एनडीएकडे असला, आणि देशात भाजप हा सिंगल लार्जेस्ट पार्टी जरी असली तरी भाजपला पूर्ण बहुमत नाही.

Loksabha Election Result 2024
Sangli Lok Sabha Result : चंद्रहार पाटलांचा 'अभिमन्यू'च; राजकारणात अनामत जप्त होणं मानहानीकारकच!

त्यामुळे केंद्रात सत्तास्थापनेसाठी यंदा भाजपला मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. तरी, आज मोदी सत्तास्थापनेचा दावा करणार असतील तर त्यांना त्याआधी एनडीएच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करावी लागणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत एनडीएची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी मित्र पक्षांचे नेते दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण, हे दोघे २०२४ च्या सत्तास्थापनेत किंगमेकर ठरू शकतात असं म्हटलं जात आहे.

Loksabha Election Result 2024
Sangli Result : विशालचा विजय एक आणि परिणाम अनेक..; दोघांना हलक्यात घेणं भाजपला पडलं महाग, सांगली काँग्रेसचाच बालेकिल्ला

दुसरीकडे, इंडिया आघाडी एनडीएतील खासदारांची किंवा मित्रपक्षांची तोडफोड करू शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा आजच केला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. संध्याकाळी ४ वाजता एनडीएचीजी दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीला सर्व मित्रपक्षांच्या प्रमुखांना बोलावण्यात आले आहे. या बैठकीमध्ये एनडीएचा नेता किंवा संयोजक निवडला जाईल. त्यातच आजच सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

याशिवाय आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीमध्येच राष्ट्रपतींना दिल्या जाणाऱ्या पत्रावर मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सह्या घेतल्या जाणार असल्याचीही माहिती आहे. आणि त्यानंतर हे पत्र आजच संध्याकाळी राष्ट्रपतींना दिलं जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रपतींना बहुमताचा आकडा सांगण्यात येणार आहे. राष्ट्रपतींकडून लगेचच एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण मिळू शकते. त्यानुसार येत्या ८ जूनला मोदी सरकारचा शपथविधी होऊ शकतो. १० जूनपासून नरेंद्र मोदी ५ ते ६ दिवसांच्या विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे त्याआधी शपथविधी व्हावा यासाठी एनडीएकडून प्रयत्न सुरू आहेत.

Loksabha Election Result 2024
Porsche Crash Case: अपघातानंतर बदललेलं ते ब्लड सॅम्पल आरोपीच्या आईचंच; धक्कादायक माहिती आली समोर

तर तिकडे इंडिया आघाडीचीही आज राजधानी दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीआधी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी आमचं सरकार बनवण्यासाठी कोणासोबत बोलण झालं नाही. राज्यातील आमच्या पक्षाचा चांगला विजय झाला. पुढची रणनीती ठरवण्यासाठी आज निकालानंतरची पहिली बैठक आहे. एनडीएसोबतच राहणार असल्याचं नीतीशकुमारांचं स्टेटमेंट आपण वाचल्याचंही पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळे इंडिया आघाडीत आज काय रणनीती ठरते हे पाहणंही महत्वाचं असेल.

शेवटी, लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहिली, तरी भाजपला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही.. पण भाजपप्रणित एनडीएला २९४ जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी २३१ जागांवर विजयी झाली आहे. त्यामुळे केंद्रातील सत्ता स्थापनेत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू हे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या भूमिकेकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

Loksabha Election Result 2024
Nandurbar Lok Sabha Election 2024 Result : नंदुरबारमध्ये 10 वर्षांनंतर कॉँग्रेसने भाजपला रोखले; डॉ. हीना गावित यांची हॅट्‌ट्रिक हुकली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com