फार्महाऊस मुख्यमंत्री! प्रियंका गांधींचे पहिल्यांदाच झाले मोदी शाहांशी एकमत

Telangana Election 2023
Telangana Election 2023
Updated on

Telangana Election 2023: तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. राहुल गांधी तेलंगणातील जनतेला काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करणार आहे. सुरुवातीपासूनच तेलंगणातील निवडणूक प्रचारात व्यस्त असलेली काँग्रेस सत्ताधारी पक्ष बीआरएस आणि भाजपवर हल्लाबोल करत आहे. यामुळे आज राहुल आणि प्रियांका पुन्हा तेलंगणातील जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच प्रियंका गांधींचे पहिल्यांदाच मोदी शाहांशी एकमत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (सोमवार) दोन जाहीर सभांना संबोधित केले. तेलंगणामध्ये एका रोड शोला त्यांनी हजेरी लावली. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आणि बीआरएस अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली. के चंद्रशेखर राव यांचा “फार्महाऊस मुख्यमंत्री” असा उल्लेख मोदी यांनी केला.

 तेलंगणाचे मुख्यमंत्री अंधश्रद्धाळू आहेत आणि त्यांचा बराचसा वेळ त्यांच्या फार्महाऊसवर जातो. भारत राष्ट्र समिती (BRS) ची सत्ता काढून टाकण्याची आणि राज्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी भाजपला सत्तेत आणण्याची वेळ आली आहे, असे मोदी म्हणाले.

भाजप जसा तेलंगणात लोकप्रिय होऊ लागला. केसीआरने भाजपशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही त्यांना नाही म्हणालो. कारण ते तेलंगणातील लोकांच्या हिताच्या विरोधात असेल. मी नकार दिल्यापासून ते माझ्यावर टीका करत आहेत. मात्र मी भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात आहे, असे मोदी म्हणाले.

Telangana Election 2023
आंतरराष्ट्रीय गँगस्टर अन् पोलिसांमध्ये गोळीबाराचा फिल्मी स्टाईल थरार, गायिकेच्या हत्येचा रचला होता कट

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रमुख जेपी नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनीही विविध मतदारसंघात जाहीर सभांना संबोधित केले. हुजुराबाद आणि पेड्डापल्ली येथे बोलताना शहा यांनी केसीआर यांना जनता भाजपसोबत असल्याचा संदेश देण्यासाठी भाजपला प्रचंड बहुमत देण्याचे आवाहन केले.

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी कोडंगल येथे एका जाहीर सभेला संबोधित केले जिथून पीसीसी अध्यक्ष ए रेवंत रेड्डी निवडणूक लढवत आहेत. तरुणांना नोकऱ्या देण्यात आणि सार्वजनिक सेवा परीक्षा आयोजित करण्यात बीआरएस सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.  जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. बीआरएसमधील सर्व मोठे नेते फार्महाऊसमध्ये बसून सरकार चालवत आहेत, असा आरोप प्रियांका गांधी वड्रा यांनी केला.

Telangana Election 2023
Uttarkashi Tunnel Rescue: बोगद्यातील मजूर आज बाहेर येणार? अवघे काही मीटर राहिलं अंतर; कुटुंबीयांना बॅगा भरुन ठेवण्याचे निर्देश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()