Narendra Modi: PM मोदींचा आणखी एक नवा विक्रम! 'या' ठिकाणी जाणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; संत मीराबाई यांच्या ५२५ व्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात सहभाग
Narendra Modi
Narendra Modi esakal
Updated on

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात भगवान राधाकृष्णाचे दर्शन घेतले. थोर कृष्णभक्त संत मीराबाई यांच्या ५२५व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मथुरेमध्ये आले होते.

यावेळी त्‍यांच्यासमवेत उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मथुरेच्या खासदार अभिनेत्री हेमामालिनी यादेखील उपस्थित होत्या. यावेळी अनेक संतमहंत देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मथुरेमध्ये येऊन राधाकृष्णाचे दर्शन घेणारे पहिले पंतप्रधान आहेत.

Narendra Modi
PM Narendra Modi:'प्रत्येकवर्षी माझी दिवाळी सीमेवरच', पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘मथुरेतील कणाकणात भगवान राधाकृष्णाचा निवास आहे. त्यांचे दर्शन घेऊन आत्यंतिक आनंदाचा भाव मनात निर्माण झाला, मथुरा आणि व्रज भूमीच्या विकासात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही.’’ ब्रज तीर्थ विकासाची स्थापना झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले.

संत मीराबाई यांच्या जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे, असेही मोदी म्हणाले.

Narendra Modi
PM Modi Video: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील पंतप्रधानांचा 'तो' पहिला व्हिडिओ आला समोर, बूमराहला काय म्हणाले मोदी?

या कार्यक्रमानिमित्त संत मीराबाई यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटाचे आणि विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात मीराबाई यांच्यावरील एक लघुपट देखील दाखविण्यात आला.

पंतप्रधान मोदी म्हणाले
- व्रज भूमीत भगवान राधाकृष्णाचे बोलावणे आल्या शिवाय कोणी येऊ शकत नाही
- भगवान श्रीकृष्ण आणि मीराबाई यांचा गुजरातशी घनिष्ठ संबंध
- व्रज क्षेत्रात होणारे बदल हे बदलत्या भारताचे प्रतीक

Narendra Modi
PM Modi Mathura Visit : PM मोदी मथुरा दौऱ्यावर; श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरात दर्शन घेणारे ठरणार पहिलेच पंतप्रधान!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.