NDA Meeting: अयोध्येवर मोदी नाराज? रामाचा भक्तिमार्ग सोडून जगन्नाथाकडे धाव; NDAच्या बैठकीतलं मोदीचं 'ते' विधान चर्चेत

Modi upset after Ayodhya defeat? मोदींनी अनेक मुद्द्यांना स्पर्श करत भाषण केलं. विशेष म्हणजे त्यांनी भाषणादरम्यान रामाचा जयघोष दिसला नाही. निवडणुकांमध्ये जय श्रीरामचा नारा देऊन प्रचार करणाऱ्या मोदींना रामाचा विसर कसा पडला? असा प्रश्न उपस्थित होतोय. अयोध्येमध्ये भाजपचा पराभव झाल्याने मोदी नाराज आहेत का? असंही बोललं जातंय.
nda meeting bjp
nda meeting bjpesakal

PM Narendra Modi Todays Speech : दिल्लीमध्ये एनडीएच्या घटकपक्षांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांची संसदीय समितीच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीसाठी घटकपक्षांचे प्रमुख नेते आणि नवनिर्वाचित खासदारांची उपस्थिती होती.

भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी संसदीय समितीच्या नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला भाजपचे नेते नितीन गडकरी, अमित शाह यांच्यासह उपस्थित भाजप नेत्यांनी अनुमोदन दिलं. तर घटक पक्षांचे नेते नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनीही मोदींच्या नावाला संमती दिली.

यावेळी मोदींनी अनेक मुद्द्यांना स्पर्श करत भाषण केलं. विशेष म्हणजे त्यांनी भाषणादरम्यान रामाचा जयघोष दिसला नाही. निवडणुकांमध्ये जय श्रीरामचा नारा देऊन प्रचार करणाऱ्या मोदींना रामाचा विसर कसा पडला? असा प्रश्न उपस्थित होतोय. अयोध्येमध्ये भाजपचा पराभव झाल्याने मोदी नाराज आहेत का? असंही बोललं जातंय.

रामाऐवजी जगन्नाथाची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रभू श्रीरामाची आठवण झाली नसली तरी त्यांनी प्रभू जगन्नानाथाचा भक्तिमार्ग आठवला आहे. मोदी म्हणाले की, आज पहिल्यांदा केरळमधून आमचा प्रतिनिधी निवडून आला आहे. अरुणाचलमध्ये सातत्याने आमचं सरकार असतं. सिक्कीममध्येही आमचं सरकार आहे. आंध्रमध्ये ऐतिहासिक विजय झाला आहे.

मोदी पुढे म्हणाले की, इतर राज्यांतील विजयाबरोबरच महाप्रभू जगन्नाथ.. मी अनुभव घेतला आहे की, इश्वराचे अनेक रुपं असतात. परंतु प्रभू जगन्नाथ हे गरीबांचे देवता आहेत. ओडिशामध्ये क्रांतीकारी निकाल लागला आहे. येणाऱ्या २५ वर्षांमध्ये महाप्रभू जगन्नाथाच्या कृपेने ओडिशा देशाच्या विकासाससोबत पुढे जाईल.

दरम्यान, ओडिशातील २१ पैसी २० जागांवर भाजपचा विजय झाला आहे. तर केवळ एका जागेवर काँग्रेसला समाधान मानावं लागलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पार्टीला १६ जागांवर विजय मिळाला असून भाजपने तीन जागांवर यश मिळवलं आहे.

nda meeting bjp
NDA Meeting Delhi : बैठकीसाठी येताच मोदींनी संविधानावर डोकं टेकवलं; पाहा Video

४ जुलै रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर भाजपने २४० जागा जिंकल्याचं स्पष्ट झालं. विजयी मेळाव्यात भाषण करण्यापूर्वी पंतप्रधानांनी जय जगन्नाथ.. असा नारा दिला होता. त्यामुळे मोदींचा भक्तिमार्ग अयोध्येतून जगन्नाथपुरीकडे निघालाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com