PM Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या उमेदवारीबाबत उद्या घोषणा होणार?, शंभर जणांची नावं जाहीर होण्याची शक्यता

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक गुरुवारी (ता. २९) दिल्लीत होणार असून यात शंभरावर उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नावे राहण्याची शक्यता आहे.
Narendra modi and Amit Shah
Narendra modi and Amit ShahEsakal
Updated on

नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक गुरुवारी (ता. २९) दिल्लीत होणार असून यात शंभरावर उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नावे राहण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पराभूत झालेल्या मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत देशात १६० लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभव पाहावा लागला होता. या मतदारसंघातील उमेदवारांची नावे प्रामुख्याने पहिल्या यादीत राहणार आहेत. पहिल्याच यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा समावेश राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी वाराणसी मतदारसंघातून तर केंद्रीय मंत्री अमित शहा हे गांधीनगर मतदारसंघातून उमेदवार राहतील.

Narendra modi and Amit Shah
MLA Pratap Sarnaik : शासनातर्फे 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' याच वर्षांपासून सुरु करा; प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मतदान केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी

महानगरांमध्ये अनेक बहुमजली इमारतींमध्ये मतदार वास्तव्याला राहतात. त्यांना या इमारतींमध्ये किंवा आसपास मतदान केंद्राची सोय करावी, अशी मागणी भाजपतर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.

Narendra modi and Amit Shah
Reliance : रिलायन्स मीडिया अन् वॉल्ट डिस्ने कंपन्यांची हातमिळवणी; नीता अंबानी होणार चेअरपर्सन

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. अनेक बहुमजली इमारती एकाच परिसरात असल्याने तेथे मतदारांची संख्या वाढलेली असते. त्यांना त्याच इमारतींमध्ये मतदानाची सोय केल्यास मतदानाच्या संख्येत वाढण्याची शक्यता असल्याचा दावा भाजपच्या शिष्टमंडळाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.