Rahul Gandhi : मोदींच्या राज्यात दलितांना रोजगार नाही

केंद्रातील भाजपचे सरकार हे दलित आणि इतर मागासवर्गीयांसाठी रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण करण्यात अपयशी ठरले असून मोदींच्या रामराज्यामध्ये त्यांना रोजगार मिळू शकत नाही.
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal
Updated on

कानपूर - केंद्रातील भाजपचे सरकार हे दलित आणि इतर मागासवर्गीयांसाठी रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण करण्यात अपयशी ठरले असून मोदींच्या रामराज्यामध्ये त्यांना रोजगार मिळू शकत नाही. देशातील या घटकांची संख्या ही नव्वद टक्के असल्याचे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज मांडले. ते भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान घंटाघर येथे आयोजित सभेत बोलत होते.

राहुल म्हणाले, ‘या देशात इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या ही तब्बल पन्नास टक्के एवढी असून १५ टक्के दलित, आठ टक्के आदिवासी आणि पंधरा टक्के अल्पसंख्याक नागरिक आहेत. तुम्ही कितीही ओरडला तरीसुद्धा तुम्हाला रोजगार मिळू शकत नाही. तुम्ही मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि गरीब असलात तरीसुद्धा तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही. पंतप्रधान मोदींनाच या देशातील लोकांना रोजगार मिळावा असे वाटत नाही.’

राहुल यांनी यावेळी सामाजिक विभाजनावर देखील भाष्य केले. देशातील माध्यमे, मोठे उद्योग आणि नोकरशाहीमध्ये दलित आणि इतर मागासवर्गीयांचा टक्का कमी असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी देशातील वाढत्या भूकबळींबरोबरच अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर देखील भाष्य केले. या सोहळ्यामध्ये इतर मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी यांचे अस्तित्व जाणवलेच नाही, असे ते म्हणाले.

म्हणून जातीनिहाय जनगणना हवी

राहुल यांनी यावेळी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा देखील मांडला. देशातील इतर मागासवर्गीयांची स्थिती जाणून घेण्यासाठी अशाप्रकारचे सर्वेक्षण होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. ‘देशातील मोठी संपत्ती काही लोकांच्या हातामध्ये एकवटली असून केवळ दोन ते तीन टक्के लोकच तिचे मालक आहेत.

हे नव्या भारतातील राजे आहेत. अदानी, अंबानी, टाटा आणि बिर्ला अशी त्यांची नावे आहेत,’ असे ते म्हणाले. राहुल यांनी यावेळी नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी आणि अग्नीवीर भरतीवर देखील कडाडून टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.