WHO च्या प्रमुखांना मोदींनी दिलं 'हे' खास गुजराती नाव

जागतिक आरोग्य संघटनेचे महानिदेशक टेड्रोस घेब्रेयेसस यांच्या खास विनंतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना हे नाव दिलं आहे.
WHO chief Tedros ghebreyesas with Narendra modi
WHO chief Tedros ghebreyesas with Narendra modiSakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जागतिक आरोग्य संघटनेचे महानिदेशक टेड्रोस घेब्रेयेसस यांना एक खास गुजराती नाव दिलं आहे. घेब्रेयेसस यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केल्यानंतर मोदींनी त्यांना हे विशेष नाव दिलं आहे. या दोघांची भेट गुजरातमधल्या गांधीनगर इथं झालेल्या जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवनिर्मिती परिषदेच्या निमित्ताने झाली. त्यावेळी या दोघांच्यात ही चर्चा झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महानिदेशक टेड्रोस घेब्रेयेसस यांच्या खास विनंतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना तुलसीभाई हे गुजराती नाव दिलं आहे. मला तुम्हाला तुलसीभाई म्हणायला मजा येतेय, असंही मोदी घेब्रेयेसस यांना म्हणाले. भारतात पिढ्यानपिढ्या तुळशीची प्रार्थना केली जाते, असंही मोदी यांनी घेब्रेयेसस यांना सांगितलं.

WHO chief Tedros ghebreyesas with Narendra modi
AYUSH थेरेपीसाठी येणाऱ्या विदेशी नागरिकांना खास व्हिसा : PM मोदी

मोदी पुढे म्हणाले, "जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस हे माझे चांगले मित्र आहेत. ते मला नेहमी सांगतात की भारतीय शिक्षकांनीच मला शिकवलं आणि त्यांच्यामुळेच मी आत्ता या स्थानी आहे. आज तर ते मला म्हणाले की मी आता पक्का गुजराती झालो आहे. त्यामुळे तुम्ही मला कुठलं नाव द्यायचं ते ठरवलंय का? त्यामुळे मी त्यांना आता तुलसीभाई म्हणणार आहे. आधुनिक पिढी तुळशीच्या रोपाचं महत्त्व विसरत चाललीये. अनेक पिढ्यांनी तुळशीच्या रोपाची पूजा केली आहे. तुम्ही लग्नसोहळ्यातही तुळशीचं रोप वापरू शकता. त्यामुळे आता तुम्ही आमच्यात आला आहात."

गुजरातमधल्या गांधीनगर इथं झालेल्या जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवनिर्मिती परिषदेमध्ये मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनौथ हेही उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.