बजेट की बात | 'गेल्या 7 वर्षात घेतलेल्या निर्णयांमुळे मागच्या चुका सुधारल्या'

बजेट की बात | 'गेल्या 7 वर्षात घेतलेल्या निर्णयांमुळे मागच्या चुका सुधारल्या'
Updated on

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेट सादर केल्यानंतर देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी भाजपने त्यांना बजेट समजवण्यासाठी बोलावल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर पंतप्रधान आज लाईव्ह आले. यावेळी त्यांनी यंदाचं बजेट सर्वसामान्यांसाठी फायद्याचं असल्याचं सांगितलं. नद्याजोड प्रकल्प आणि नळाला पाणी पुरवण्यासाठी खर्च करण्यात आलेले एक लाख कोटी रुपयांचं महत्व सांगितलं.

यावेळी पंतप्रधानांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. 7 वर्षांपूर्वी भारताचा जीडीपी 1 लाख 10,000 कोटी रुपये होता. पण आज तो सुमारे 2 लाख 30,000 कोटी रुपये आहे. देशाचा परकीय चलन साठा 200 अब्ज डॉलरवरून $630 अब्ज झाला आहे. आमच्या सरकारच्या प्रभावी धोरणांमुळे याचा फायदा मिळाला आहे.

9 कोटी ग्रामीण घरात पाणी पोहोचत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत 5 कोटी पाण्याचे कनेक्शन दोन वर्षात करण्यात आले. 40 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला होता. येणाऱ्या काळात आणखी ६० हजार कोटींचा निधी यासाठी खर्च होणार आहे.

काय म्हणाले पंतप्रधान?

100 वर्षातील सर्वात मोठ्या वैश्विक महामारीशी देश लढत आहे. पुढे जे जग आपण पाहणार आहोत, ती कोरोनापूर्वीप्रमाणे नसणार आहे. द्वितीय विश्वयुद्धानंतर जगात मोठे बदल होणार आहेत. याचे संकेत आता दिसू लागले आहेत.

भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला आहे.

भारत आत्मनिर्भर बनायला हवा आणि त्यावर आधुनिक भारताचा निर्माण व्हायला हवे.

गेल्या 7 वर्षात घेतल्या गेलेल्या निर्णयांमुळे मागच्या चुका सुधारल्या

1 लाख 10 हजार कोटीपासून 2 लाख 30 हजार करोडच्या आसपास

निर्यात 4 लाख 70 हजार करोडपर्यंत पोहोचला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.