नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार (BJP Government) केंद्रामध्ये सत्तेवर आले त्याला आज (ता. ३०) सात वर्षे (Seven Years) पूर्ण होत आहेत. सरकारच्या पहिल्या पंचवार्षिकात मोठे निर्णय (Big Decision) घेण्यात आले. दुसऱ्या पंचवार्षिकाला दोन वर्षे पूर्ण होताहेत. तथापि, कोरोनामुळे (Corona) सरकारला अन्य निर्णय घ्यायला मर्यादा आल्या आहेत. (Narendra Modi Government Decision Income and Investment)
कृषीत आमूलाग्र बदलांचा आग्रह
पीएम किसान सम्मान निधी या योजनेंतर्गत साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ७२ हजार कोटी जमा
पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्षाला सहा हजार जमा करण्याचा निर्णय
मोठ्या निर्णयांचे षटकार
नीती आयोग : सहा दशकांचा योजना आयोग इतिहासजमा
निर्गुंतवणूक : सुमारे एक लाख कोटी रुपयांची निर्गुंतवणूक केली.
बॅंकिंग सुधारणा : सार्वजनिक उद्योगातील छोट्या बॅंकांचे मोठ्या बॅंकांत विलीनीकरण.
मेक इन इंडिया : निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी देशांतर्गत उत्पादनावर भर
आत्मनिर्भर भारत : आयातीत मालावरील अवलंबित्व कमी करण्यासाठीची प्रोत्साहनपर योजना
उडान : विमान प्रवास सामान्यांच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न
स्मार्ट सिटी : देशातील प्रमुख शहरातील नागरी सुविधांत गुणात्मक सुधारणांसाठीची योजना, ९८ शहरांची निवड
उदय : वीजवितरण व्यवस्थेत सुधारणांसाठी पावणेदोन लाख कोटींच्या उभारणीसाठीची योजना
अर्थसंकल्पातून धनवर्षाव २०२१-२०२२
२ लाख ३३०८३ - एकूण तरतूद
११००५५ - यातील १०७१०० कोटी रू. भांडवली खर्चासाठी
११८१०१ - रस्ते वाहतूक, महामार्ग
६४१८० - आरोग्य सेवा
(प्रमाण - कोटी रुपयांत)
२०२० - पायाभूत प्रकल्पांतील गुंतवणूक
५ ट्रिलियन रुपये - वीज क्षेत्र
२.७ ट्रिलियन रुपये - रस्ते बांधणी, देखभाल दुरूस्ती
पंतप्रधान बोलतात तेव्हा
मन की बात : नागरिकांशी संवादासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे लाखो श्रोते आहेत.
देशातील दरडोई उत्पन्न
२०२०-२१ : ९९१५५ रू. (गतवर्षीपेक्षा ८.७ टक्के घट)
२०१९-२० : १०८६२० रू.
देशाच्या जीडीपीत शेतीचा वाटा
२०२०-२१ : २० (सतरा वर्षात पहिल्यांदा भरीव वाढ)
२०१९-२० : १७.८
(प्रमाण : टक्क्यांत)
धान्य उत्पादनाने कोठारे भरली
२०१९-२० : २९६.६५
२०१८-१९ : २८५.२१
(दशलक्ष टनांत)
या निर्णयांमुळे धर्मक्षेत्र ढवळले
अयोध्येत राममंदिर - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ५ ऑगस्टला अयोध्येत भव्यदिव्य राममंदिरासाठी शिलान्यास
३७० वे कला रद्द - जम्मू- काश्मीरचा वेगळ्या राज्याचा दर्जा काढून घेतला, नंदनवनात आंदोलन
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका (एनआरसी) - स्थलांतरितांना रोखण्याचा प्रयत्न, देशभर आंदोलन
शबरीमला मंदिर प्रवेश - सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटाच्या महिलांसाठी शबरीमला मंदिरात प्रवेशाचा मार्ग मोकळा केला
तोंडी तलाक गुन्हा - मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक तोंडी तलाक पद्धतीला गुन्हा ठरवून दिलासा दिला
अर्थकारणाला नवी चौकट
वस्तू व सेवा कर (जीएसटी) - ‘एक देश, एक बाजारपेठ, एक कर प्रणाली’ प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न
दिवाळखोरी संहिता - बुडीत कर्जावर तोडगा काढण्याचा प्रयत्न त्याद्वारे ‘एनसीएलटी’कडे जाण्याचा मार्ग मोकळा
मुद्रा योजना - सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पहिल्या चार वर्षांत ७-८लाख कोटींचा कर्जपुरवठा
फाइव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी - अर्थव्यवस्थेला २०२५पर्यंत सोन्याचे दिवस आणण्याचा संकल्प.
पायाभूत सेवांना बळकटी
बुलेट ट्रेन - जपानच्या मदतीने मुंबई-अहमदाबाद यांना जोडणारा महा रेल्वेप्रकल्प
रस्ते - भारतमाला, सागरमाला, जलमार्गांचा विकास, महामार्गांचा विस्तार विशेषतः ईशान्येकडे रस्तेविकास
रेल्वे - रेल्वेमार्ग विकासावर भर. दुहेरी ब्रॉडगेज, विद्युतीकरण, रेल्वे स्थानकांचा गुणात्मक दर्जा उंचावला
ऊर्जा - १८ हजार गावांचे विद्युतीकरण, उज्ज्वल एलईडीद्वारे ऊर्जा बचतीवर भर. सौरऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन.
राजकारण श्रीमंत झाले
इलेक्टरोल बाँड - राजकीय पक्षांना दात्याचे नाव गुप्त ठेवून निधी स्वीकारण्यास अनुमती देणारी योजना.
लोककल्याणाच्या विविध योजना
डीबीटी - ‘आधार’चा आधार घेत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसा जमा करणे शक्य
जाम - जनधन-आधार-मोबाईल (जाम) याद्वारे कल्याणकारी योजना राबविल्या
जनधन - नागरिकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी कोट्यवधी खाती उघडली
डिजिटल इंडिया - कॅशलेस व्यवहार, आर्थिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन, बॅंकांवरील ताण घटला
अन्य धोरणात्मक निर्णय
समाजसेवेला लगाम - परकी निधीवर समाजसेवा करणाऱ्या एनजीओंना लगाम
नवे शैक्षणिक धोरण - देशासाठी नव्या आकृतीबंधासह प्रयोगशिलतेला प्रोत्साहन
स्वच्छ भारत मिशन - देशभर नऊ कोटी शौचालये उभारली
उज्ज्वला योजना - ग्रामीण भागातील महिलांसाठी सवलतीत गॅस पुरवठा
आयुष्मान भारत - सर्वसामान्यांना आरोग्य विम्याचे कवच
बेटी बचाव, बेटी पढाओ - मुलांच्या शिक्षणास प्रोत्साहन देणारी योजना.
आर्थिक कमकुवतांसाठी आरक्षण - आर्थिक कमकुवत घटकांना (ईडब्ल्यूएस) शिक्षण संस्था, सरकारी नोकऱ्यांमध्ये १०टक्के आरक्षण.
नमामी गंगे - गंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद
जलजीवन मिशन - स्वच्छ, पिण्यायोग्य पाण्याच्या पुरवठ्यासाठी योजना.
योग दिवस - जगभर २१ जून रोजी पाळणे सुरू केले.
यावरून वादंग
नोटाबंदी - ८ नोव्हेंबर २०१६ रोजी व्यवहारातील ८६ टक्के चलन बाद
विमान खरेदी - लष्करी आधुनिकीकरणावर भर, राफेल या लढाऊ विमानांची खरेदी
कृषी कायदे - तरतुदींना आक्षेप घेत शेतकरी रस्त्यांवर
सेंट्रल व्हिस्टा - नवी संसद उभारणीसाठी वीस हजार कोटींचा प्रकल्प
व्हॅक्सिन मैत्री - परदेशाला कोरोना प्रतिबंधक लशींचा पुरवठा
रणनीतीक निर्णय
बालाकोट सर्जिकल स्ट्राईक - पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला
व्हॅक्सिन डिप्लोमसी - उपयुक्त लशी शेजारी देशांना दिल्या
‘क्वाड’मध्ये सहभाग - चीनला शह देताना अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाला साथ
ब्रिक्स - या संघटनेतील देशाचा सहभाग वाढविला
एससीओ - शांघाय सहकार्य संघटनेमध्ये (एससीओ) भारत सामील
भारत-बांगलादेश सीमा करार - बंगालच्या उपसागरातील काही द्विपकल्पांचा तिढा सोडवला.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ - तिन्हीही सैन्यदलांच्या कामकाजात सूसुत्रीकरणासाठी सरसेनाध्यक्ष पदाची निर्मिती
सकाळ संशोधन आणि विकास विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.