PM Modi In Ayodhya: 32 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मोदींनी अयोध्येत....काय झालं होतं या दिवशी?

PM Modi In Ayodhya: ३२ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत जय श्री रामच्या घोषणा देत मंदिर बनल्यानंतर तिथे परत येण्याचा निश्चय केला होता.
PM Modi In Ayodhya
PM Modi In AyodhyaEsakal
Updated on

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु असून २२ जानेवारी रोजी इथं रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जावा असं आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. हे मंदिर उभं राहावं यासाठी अनेक साधू-संतांसह अनेकांना निर्धार केले होते. काहींनी मंदीर होईपर्यंत लग्न न करण्याचे, काहींनी चप्पल न घालण्याचे, तर काहींनी न बोलण्याचे प्रण केले होते. अशातच ३२ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत जय श्री रामच्या घोषणा देत मंदिर बनल्यानंतर तिथे परत येण्याचा निश्चय केला होता.

दरम्यान, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. राममंदिर आंदोलनात भारतीय जनता पक्षाने कायमच आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या जाहीरनाम्यातही मंदिर बनवण्याबाबत सातत्याने समावेश करण्यात आलेला आहे.

PM Modi In Ayodhya
Ram Mandir: राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळ्याला पाहुण्यांसह PM मोदींना दिलं जाणार 'हे' खास गिफ्ट

इतिहासाची पाने पाहिली तर आजपासून ३२ वर्षांपूर्वी याच दिवशी नरेंद्र मोदी दुपारी अयोध्येतील राम मंदिराच्या ठिकाणी पोहोचले होते. एकतेचा संदेश देण्यासाठी ते कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत एकता यात्रेवर होते.

नरेंद्र मोदी अयोध्येला पोहोचले तेव्हा त्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा देत राम मंदिर बांधल्यानंतरच येथे परतणार असल्याची शपथ घेतली. अगदी तसेच घडले. राम मंदिराची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली होती. आता प्राणप्रतिष्ठाही त्यांच्या हस्ते होणार आहे.

PM Modi In Ayodhya
PM Modi Nashik Visit : ‘होर्डिंग’ द्वारे इच्छुकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन; शहरभर पंतप्रधान यांच्या स्वागताचे फलक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.