Narendra Modi independece day : 'स्वच्छ भारत ते मेक इन इंडिया' वाचा काय आहेत आजवर स्वातंत्र्यदिनी मोदींनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

Narendra Modi
Narendra Modi esakal
Updated on

संपूर्ण देशामध्ये देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाचा तिरंगा फडकवला. यानंतर त्यांनी देशाला संदेशही दिला. आज नरेंद्र मोदी देशाला दहाव्यांदा संदेश देत आहेत. नरेंद्र मोदी दर वर्षी मोठी घोषणा देशवासीयांसाठी करत असतात. 2014 पासून ते आतापर्यंत दरवर्षी नरेंद्र मोदींनी एक नवीन घोषणा देशवासीयांसाठी केली आहे.

२०१४ - मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत अभियान

2014 साली नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला स्वातंत्र्य दिवस होता. यावेळी आपल्या पहिल्याच भाषणामध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केल्याची घोषणा केली. याचबरोबर देशात जगभरातून गुंतवणूक होवो यासाठी मेक इन इंडियाची घोषणा केली.

Narendra Modi
Peru Alien News : सात फुटांच्या एलियनने गावकऱ्यांवर केला हल्ला, बंदूकीच्या गोळ्यांनाही देत नाही दाद; प्रत्यक्षदर्शींचा दावा!

ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्वच्छ भारत मिशन ची सुरुवात झाली. तर मेक इन इंडिया साठी देशांमध्ये जागतिक दर्जाचा उत्पन्न पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रमुख नवीन उपक्रम त्याकाळी नरेंद् मोदी यांनी सुरू केले.

Narendra Modi
Eknath Shinde independence day : मुख्यमंत्र्यांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा अन् वाचला कामांचा पाढा !

२०१५ - स्टार्टअप इंडिया

2015 साली आपल्या दुसऱ्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडियाचा नारा दिला. स्टार्ट अप इंडिया हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे. ज्याचे उद्देश देशातील स्टार्टअप आणि नवीन कंपन्यांसाठी एक मजबूत इकोसिस्टीम तयार करणे आहे यामुळे देशाचा आर्थिक विकास होईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण होईल असे त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.

Narendra Modi
Indira Gandhi: इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे केले दोन तुकडे, बांगलादेश स्वातंत्र्य होण्यात भारताचा मोठा हात

२०१६ जी एस टी

२०१६ साली नरेंद्र मोदींनी देशामध्ये जीएसटी लागू करण्याची घोषणा केली. जीएसटीच्या माध्यमातून देशात कर्णप्रणालीत एक प्रकारची समानता येईल असे मोदी म्हणाले होते. एकसमान प्रणालीमुळे भारत जोडला जाईल. यासाठी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू केला.

Narendra Modi
PM Modi Speech : मोदींनीच तोडलेत लाल किल्ल्यावरील भाषणाचे सर्व रेकॉर्ड; यावेळचं भाषण किती मिनिटं रंगलं?

२०१७ न्यू इंडिया

२०१७ साली भाषण करताना नरेंद्र मोदींनी नवीन भारताचा नारा दिला म्हणजेच न्यू इंडियाचा नारा दिला. भारत छोडो आंदोलनात 75 वर्ष पूर्ण झाली आणि चंपारण सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाली या निमित्त न्यू इंडियाचा निर्धार भारतीयांनी केला पाहिजे असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. यावेळी आम्हाला सुरक्षित, समृद्ध आणि शक्तिशाली असा न्यू इंडिया म्हणजेच नवा भारत घडवायचा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. स्वातंत्र्यलढा हा आपल्या भावनांशी निगडित आहे असे मोदी म्हणाले होते.

Narendra Modi
Independence Day Red Fort : लाल किल्ला कधी बांधण्यात आला ? काय आहे त्याचा इतिहास ?

२०१८ आयुष्यमान भारत

2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेची घोषणा केली. देशातील अकरा राज्यांमधील निवडक जिल्ह्यांमध्ये आयुष्यमान भारत राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना सुरू करण्याची घोषणा यावेळी नरेंद्र मोदी यांनी केली. भारतातील गरिबांना चांगल्या दर्जाची आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळावी याची काळजी घेण्याची वेळ आली आहे असे म्हणत पंतप्रधान जन आरोग्य अभियान 2018 साली सुरू करण्यात आले. यावेळी सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना आयुष्यमान कार्ड जारी करण्यात आले.

Narendra Modi
Rahul Gandhi : काँग्रेस 'अलर्ट मोड'वर! शरद पवार-अजित पवार भेटीबाबत राहुल गांधींना दिली माहिती

२०१९ सीडीएसची घोषणा

२०१९ साली नरेंद्र मोदी यांनी सीडीएस पद निर्माण करण्याची घोषणा केली. तिन्हीही सैन्य दलांमध्ये अधिक चांगला समन्वय होवो यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद निर्माण केले गेले. यामुळे सैन्यदल मजबूत होईल अशी घोषणा यावेळी भारताच्या स्वतंत्र दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी केली. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच तिन्ही सेवांचे कमांडर यांची म्हणून नियुक्ती केली जाईल असे नरेंद्र मोदी म्हणाले. 30 डिसेंबर 2019 रोजी जनरल बीपीन रावत यांची सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Narendra Modi
PM Modi Speech: 'देश मणिपूरच्या जनतेसोबत, शांततेनेच यावर तोडगा निघेल'; स्वातंत्र्यदिनी PM मोदींनी लाल किल्ल्यावरून दिले आश्वासन

२०२० वोकल फॉर लोकल

२०२० साली वोकल फॉर लोकल हा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले होते की, भारताची मानसिकता ही वोकल फॉर लोकल असली पाहिजे. आपण आपल्या स्थानिक उत्पादनांचे कौतुक केले पाहिजे. जर आपण असे केले नाही तर आपल्या उत्पादनांना चांगली संधी मिळणार नाही. केंद्र सरकारच्या म्हणण्या नुसार या मोहिमेंतर्गत देशांतर्गत उत्पादन वाढले आहे.

Narendra Modi
Gandhi - Godse Ek Yudh: पठाण नाही तर जान्हवी कपूरने गांधी - गोडसे पाहिला, हे आहे मोठं कारण

२०२२ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

15 ऑगस्ट 2021 रोजी भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला या त्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी 75 आठवडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली. आझादी का अमृत महोत्सवाचा अधिकृत प्रवास १२ मार्च २०२१ रोजी सुरू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.