नरेंद्र मोदी म्हणाले, भारत जगाला पोसण्यासाठी तयार; पण...

Narendra Modi
Narendra ModiNarendra Modi
Updated on

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक अन्नसाठा (युक्रेनमध्ये) कमी होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी झालेल्या संभाषणात जागतिक व्यापार संघटनेने (WTO) थोडी शिथिलता दिल्यास आम्ही भारतीय खाद्यपदार्थांना पुरवणे (enough food) सुरू करू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मंगळवारी (ता. १२) म्हणाले.

गुजरातमधील अडालज येथील श्री अन्नपूर्णा धाम ट्रस्टच्या वसतिगृह आणि शिक्षण संकुलाचे व्हिडिओ लिंकद्वारे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी हे सांगितले. युद्धामुळे जगाच्या विविध भागात अन्नसाठा कमी होत आहे. आज जग एका अनिश्चित परिस्थितीला तोंड देत आहे. कारण, कोणालाही हवे ते मिळत नाही. सर्व दरवाजे बंद झाल्याने पेट्रोल, तेल, खते घेणे अवघड झाले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून प्रत्येकाला आपला साठा सुरक्षित करायचा आहे, असेही नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

Narendra Modi
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; रक्तस्राव झाल्यानंतर घरातच मृत्यू

जग आता एका नव्या समस्येला तोंड देत आहे. जगातील धान्यसाठा संपत चालला आहे. मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलत होतो आणि त्यांनीही हा मुद्दा सांगितला. जागतिक व्यापार संघटनेने परवानगी दिली तर उद्यापासून भारत जगाला अन्नसाठा पुरवण्यास तयार आहे. आमच्याकडे आधीच आमच्या लोकांसाठी पुरेसे अन्न आहे.

आमच्या शेतकऱ्यांनी (Farmers) जगाला खायला घालण्याची व्यवस्था केली आहे. तथापि, आपल्याला जगाच्या नियमांनुसार काम करावे लागेल. म्हणून मला माहीत नाही की जागतिक व्यापार संघटना कधी परवानगी देईल. जेणेकरून आपण जगाला अन्न पुरवठा (enough food) करू शकू, असेही नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()