Narendra Modi : कृत्रिम तंत्रज्ञानाच्या वापरावर भारताचा भर

नरेंद्र मोदी यांचा बिल गेट्‌स यांच्याशी ‘एआय’च्या वापराबाबत संवाद
Narendra Modi
Narendra Modiesakal
Updated on

नवी दिल्ली : डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज व मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्यात गुरुवारी संवाद झाला. यात पंतप्रधान मोदींनी आरोग्य आणि कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर या मुद्द्यांवर सरकारच्या कामगिरीची माहिती दिली. सोबतच, आपल्या नव्या सत्ताकाळात कृषी क्षेत्रात क्रांती, महिलांचे आरोग्य या धोरणांवर भर असेल, असे सांगत सत्तावापसीचेही स्पष्ट सूतोवाचही केले.

Narendra Modi
Arvind Kejriwal Health : अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली; शुगर लेव्हल 46 ने घसरली

लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान मोदींच्या सरकारी निवासस्थानी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमधून हा संवाद झाला. पंतप्रधान मोदींनी बिल गेट्स यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नमो अॅपमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापर आणि त्यातून येणाऱ्या सेल्फीचे प्रात्यक्षिकही दाखविले. जी-२० परिषदेच्या निमित्ताने भारतातील डिजिटल क्रांतीबद्दल जगभरात असलेल्या उत्सुकतेचा उल्लेख करताना मोदींनी सांगितले, की डिजिटल तंत्रज्ञानाचे आपण लोकशाहीकरण केले असून यामुळे सर्वसामान्यांना मदत होत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील रुग्णालये शहरांमधील आधुनिक रुग्णालयांशी जोडली गेली असून तंत्रज्ञानाच्या मदतीने शेकडो किलोमीटर दूरवरून डॉक्टर रोगनिदान करतो. यामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे.

Narendra Modi
Mental Health: मेंटली चेकआउट म्हणजे काय? जाणून घ्या लक्षण अन् उपाय

शिक्षणातील बदलासाठी

तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण क्षेत्रात बदलाचा मानस पंतप्रधान मोदींनी बिल गेट्‌स यांना बोलून दाखवला. ते म्हणाले,‘‘मला शिक्षकांच्या उणिवा भरून काढायच्या आहेत आणि मुलांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी दृक्‌श्राव्य साधने तयार केली जात आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा ही एक मोठी गरज आहे. महिला ताबडतोब नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. त्यामुळेच ''ड्रोन दीदी’ सुरू झालेली योजना यशस्वीपणे चालू आहे.’’ कोरोना विषाणूशी लढण्यासाठी लोकप्रशिक्षणावर भर देण्यात आल्याचे मोदींनी सामगितले. ‘‘ही लढाई विषाणू विरुद्ध जीवन अशी होती. त्यामुळे थेट जनतेशी संवाद आणि सर्व नियमावलीच्या पालनाचे आवाहन यातून एक मोठे जनआंदोलन उभे राहिले. असा दावा मोदींनी केला.

‘आई’ व ‘एआय’

कृत्रिम तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘एआय खूप महत्त्वाचे आहे. आमच्या देशात मूल जन्माला आल्यानंतर पहिला शब्द ‘आई’ असा उच्चारते. आता ‘आई’बरोबर ‘एआय’चाही उच्चार मुले करू लागली आहेत.’’ दरम्यान, बिल गेट्स यांनी भारताचे कौतुक करताना देशात सध्या डिजिटल सरकार असल्याचा दावा केला. भारत केवळ तंत्रज्ञानाचा स्वी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.