Narendra Modi Lok Sabha Speech: विरोधकांकडे 'सिक्रेट' वरदान; पंतप्रधान मोदी यांनी सांगितले ३ उदाहरणं

Narendra Modi Lok Sabha Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अविश्वास प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधक जेव्हा काही वाईट करण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांच्याकडून चांगलेच घडते.
PM Modi in Parliament
PM Modi in Parliament Team eSakal
Updated on

Narendra Modi Lok Sabha Speech:

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अविश्वास प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधक जेव्हा काही वाईट करण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांच्याकडून चांगलेच घडते. मला वाटतं विरोधकांकडे एक सिक्रेट वरदान आहे. त्यामुळे त्यांनी कोणाचं वाईट करायचं ठरवलं तर चांगलंच होतं. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण मी आहे. पण, विरोधकांच्या सिक्रेट वरदानाचे मी आणखी तीन उदाहरण देतो, असं म्हणत मोदी यांनी बँकिंग क्षेत्र, एचएएल आणि एलआयसी कंपनीची उदाहरणे दिली.

बँकिंग क्षेत्र बुडेल अशी अफवा विरोधकांनी पसरवली होती. परदेशी लोकांना बोलावून आणून अनेक खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या. आता भारतीय बँकिंग क्षेत्राचं काही खरं नाही, असं म्हणण्यात आलं. त्यांनी बँकेचे वाईट होईल असं म्हटलं होतं. पण, आता बँकिंग क्षेत्राचे नेट प्रॉफिट दुपट्टीपेक्षा जास्त झाले आहे, असं मोदी म्हणाले.

PM Modi in Parliament
Amit Shah: 'मोदी सरकारने काहीच दिलं नाही पण राहुल गांधींमुळे...', कलावती यांच्या दाव्याने अमित शाह पडले तोंडघशी!

दुसरे उदाहरण देताना मोदी म्हणाले की, संरक्षण क्षेत्रातील हेलिकॉप्टर बनवणारी सरकारी कंपनी एचएएल वरुन किती खोट्या बातम्या पसरवल्या. खूप काही पसरवलं गेलं.एचएएल बंद पडेल अस म्हणून कर्मचाऱ्यांना भडकवण्यात आलं, त्यांच्यात भीती निर्माण करण्यात आली. पण, आज एचएएलने उत्तुंग यश गाठलं आहे.एचएएल जगभरात देशाची मान उंचावली आहे.

PM Modi in Parliament
केंद्रीय निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळले? मोदी सरकारच्या निर्णयाने वादाची शक्यता

एलआयसीबाबतही विविध अफवा पसरवण्यात आल्या. एलआयसीमधील गरिबांचे पैसे बुडाले. वाट्टेल ते खोटे सांगण्यात आले. पण, आज एलआयसी मजबूत बनत आहे. सरकारी कंपनीमध्ये पैस लावण्याचा आज सल्ला देत आहेत,असं म्हणत मोदींनी तिसरे उदाहरण दिले.

विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले. देशाच्या कोटी-कोटी लोकांचे आभार मानतो. देव खूप दयाळू आहे. तो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून इच्छा पूर्ण करुन घेतो. मी याला देवाचा आशिर्वाद मानतो की त्यांनी अविश्वास ठराव आणला. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावेळी विरोधकांची प्रचंड गोंधळ घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.