Narendra Modi : मोदींचं २०२२ पर्यंतचं टार्गेट खूप मोठं होतं, नक्की काय पूर्ण झालं?

भारतात सत्ताबदल होऊन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून विराजमान झाले.
Narendra Modi
Narendra Modi esakal
Updated on

Narendra Modi : भारतात सत्ताबदल होऊन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून विराजमान झाले. त्यानंतर अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवण्याचे संकल्प करण्यात आले.

Narendra Modi
Narendra Modi : ‘कर्तव्यपथा'वरील तपश्चर्येत नरेंद्र मोदी आजही मग्न!

नरेंद्र मोदींनी भारताचं जगभरात वेगळं स्थान असावं यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच अनेक घोषणा केल्या. यातील काही गोष्टींवर काम सुरू आहे. तर, काही गोष्टींमध्ये परिस्थिती आहे त्यापेक्षाही खराब झाली. आज आम्ही अशाच काही मोदींच्या घोषणांबद्दल माहिती सांगणार आहोत.

Narendra Modi
मोदी काळातील 'सेन्सेक्स'च्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे

अर्थव्यवस्थेला बूस्टर

नरेंद्र मोदींनी भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 2022 पर्यंत दुप्पट होऊन 5 ट्रिलियन डॉलर होईल आणि उत्पादन आणि कृषी क्षेत्राचे योगदान प्रत्येकी $1 ट्रिलियन होईल. असे सांगितले होते. मात्र, सध्या भारतीय अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियन डॉलर इतकी आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन

वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. यामुळे लाखो शेतकऱ्यांना नुकसाना सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांचा हा तोटा भरून निघावा यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात मोदींनी नऊ राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ संवाद साधत २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते.

२०१४-१९ मध्ये शेतीसाठी २.१२ लाख कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती, जी मागील पाच वर्षांत वाटप केलेल्या १.२१ लाख कोटीच्या जवळपास दुप्पट होती. मात्र, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आदींमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट तर झाले नाहीच मात्र, शेतकऱ्यांची अर्थिक स्थिती अधिक खालावल्याचे चित्र दिसून येत आहे.

Narendra Modi
Rishabh Pant Accident: पंतच्या अपघातावर प्रतिक्रिया देताना मोदी झाले भावूक, मला तर...

बुलेट ट्रेन

भारतात २०२२ पर्यंत बुलेट ट्रेनचा प्रकल्प प्रत्यक्षात येईल असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओमानमध्ये भारतीयांना संबोधित करताना सांगितले होते. २०१७ मध्ये मोदींनी शिंजो आबे यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या ५०८ किमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली होती मात्र, हा प्रकल्प पूर्णपणे सुरू होण्यास अजून काहीकाळ लागणार आहे.

प्रत्येक भारतीयाला घर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीयाचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी पंतप्रधान आवास योजना जाहीर केली होती. या योजनेच्या माध्यमातून सर्व सामान्यांना परवडणारी घरांचे वाटप करण्यात आले. मात्र, अद्यापही करोडो भारतीय त्यांच्या स्वतःच्या घराच्या प्रतिक्षेत आहेत.

Narendra Modi
Indian Constitution : मोदी सरकारची विचारसरणी स्पष्ट आहे, देश संविधानानुसारच चालेल - किरेन रिजिजू

प्रत्येक घरात २४X ७ वीज

भारतातील काही भागात आजही वीज पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. २०१५ मध्ये मोदींनी २०२२ मध्ये ज्यावेळी भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरे करेल तेव्हा प्रत्येक घरात चोवीस तास वीज पुरवठा असला पाहिजे असे विधान केले होते. मात्र, आजही देशातील अनेक भागात वीज पुरवठा नियमित केला जात नाही.

अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याचे उद्दिष्ट

अंतराळक्षेत्रात भारताने खूप मोठी प्रगती केली आहे. वरील घोषणांप्रमाणे मोदींनी अंतराळात भारत २०२२ पर्यंत अंतराळवीरांना पाठवेल असा दावा केला होता. मात्र वर्ष संपत आले तरी अंतराळात अद्यपपर्यंत एकही भारतीय अंतराळवीराला पाठवण्यात आलेले नाही. मात्र, ज्या दिवशी अंतराळात भारतीय नागरिक पहिलं पाउलं ठेवेल तो देशासाठी सर्वात अभिमानास्पद दिवस असेल हे तितकेच खरे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.