CM नितीश नाराज कुणावर? नीती आयोग की PM; मोदींच्या बैठकीला राहणार अनुपस्थित

दुसऱ्यांदा पंतप्रधान यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाही
Nitish Kumar Latest News
Nitish Kumar Latest NewsNitish Kumar Latest News
Updated on

Nitish Kumar Latest News पाटणा : नीती आयोगाची बैठक सोमवारी (ता. ८) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) उपस्थित राहणार नाही. एका महिन्यात दुसऱ्यांदा पंतप्रधान यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाही. यामुळे जेडीयू आणि भाजपमध्ये सर्व ठीक आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार कोरोनातून बरे झाले आहे. नितीश कुमार यांना नीती आयोगाच्या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांना पाठवायचे होते. परंतु, बैठकीला फक्त मुख्यमंत्रीच उपस्थित राहू शकतात, असे सांगण्यात आले. मात्र, दर सोमवारी होणाऱ्या जनता दरबारात मुख्यमंत्री नितीशकुमार उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Nitish Kumar Latest News
Accident In River Ganga : बोटीत सिलिंडरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू

मुख्य म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे जनता दरबार कार्यक्रम आयोजित केला जात नव्हता. नीती आयोगाच्या (Niti Aayog) क्रमवारीवर नितीश कुमार संतापले आहे. नीती आयोगाच्या क्रमवारीत बिहारला विकसित राज्यांच्या क्रमवारीत नेहमीच खालच्या क्रमांकावर ठेवले जाते. यामुळे नितीश कुमार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या महिन्यात तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आयोजित केलेल्या डिनरला मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित नव्हते. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीलाही नितीश कुमार उपस्थित राहिले नाही. त्या बैठकीला नितीश कुमार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पाठवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.