भाजप नेते नरेंद्र मोदी हे आज सायंकाळी 7.15 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथ विधी सोहळ्यानंतर लगेचच ते पंतप्रधानपदी विराजमान होतील. पण, पंतप्रधान पद ग्रहण करण्याआधी शपथ का घेतली जाते?
शपथविधी सोहळा इतका महत्त्वाचा का आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि अगदी पंचायत आणि सरपंच का आणि कशावर शपथ घेतात?
आपल्या देशाच्या संविधानात शपथ घेण्याबाबत काय नियम आहेत? शपथ मोडल्याबद्दल किंवा भंग केल्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे का? त्याचा आपल्या देशाच्या इतिहासाशी काही विशेष संबंध आहे का?
शपथविधी सोहळा इतका महत्त्वाचा का आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि अगदी पंचायत आणि सरपंच का आणि कशावर शपथ घेतात? आपल्या देशाच्या संविधानात शपथ घेण्याबाबत काय नियम आहेत? शपथ मोडल्यास शिक्षेची तरतूद आहे की भंग केल्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे का? याची माहिती घेऊयात.
खासदार, आमदार, पंतप्रधान आणि मंत्र्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेवर विश्वास ठेवण्याची शपथ घ्यावी लागते. जोपर्यंत खासदार किंवा आमदार शपथ घेत नाहीत, तोपर्यंत त्यांना कोणत्याही सरकारी कामात भाग घेता येत नाही. त्यांना सभागृहात जागा दिली जाणार नाही. म्हणजे ते निवडून आले असतील पण खासदार मानले जाणार नाहीत, अशी माहिती लोकसभेचे माजी सचिव एसके शर्मा यांनी दिली.
संबंधित व्यक्ती सभागृहाला कोणतीही नोटीस देऊ शकणार नाही किंवा कोणताही मुद्दा उपस्थित करू शकणार नाही. त्यांना पगार आणि सुविधाही मिळणार नाहीत. घटनात्मक पद ग्रहण करण्यासाठी शपथ ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, त्यानंतरच सरकारी कामात आणि सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येते, असेही ते म्हणाले.
नवनिर्वाचित खासदारही घेतात शपथ
देशभरातील 543 जागांवरून निवडून आलेल्या सर्व खासदारांना लोकसभेत शपथ दिली जाते. लोकसभेत पंतप्रधान आणि मंत्रीही खासदार म्हणून शपथ घेतात.
कोणती शपथ घेतात?
राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, पंच-सरपंच आणि सरकारी सेवेत असलेले हे पदाची प्रतिष्ठा राखण्याची, प्रामाणिकपणे आणि निःपक्षपातीपणे काम करण्याची आणि सर्व परिस्थितीत देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्याची शपथ घेतात. हिंदी आणि इंग्रजीसह कोणत्याही भारतीय भाषेत शपथ घेता येते.
मंत्रिपदाच्या शपथेचे दोन भाग आहेत
पहिली म्हणजे पदाची शपथ, पदाची प्रतिष्ठा राखण्यासाठी खासदार आणि आमदार शपथ घेतात. यामध्ये प्रामाणिकपणे आणि निःपक्षपातीपणे काम करण्याची आणि देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवण्याची ही शपथ असते.
दुसरी गोपनीयतेची शपथ, केंद्र आणि राज्यात मंत्रीपदावर नियुक्त झालेले खासदार आणि आमदार गोपनीयतेची शपथ घेतात.
संसदेतील शपथविधीचे नियम काय आहेत
संविधानातील कलम 75 नुसार पंतप्रधानांना राष्ट्रपतींसमोर शपथ घ्यावी लागते. शपथ घेण्यासाठी एका विशिष्ट प्रतिज्ञापत्राचे पालन केले जाते. जे पंतप्रधान वाचतात आणि स्वीकारतात. शपथेनंतर, अधिकृत प्रमाणपत्र देखील जारी केले जाते. ज्यामध्ये पंतप्रधान शपथ घेण्याची तारीख आणि वेळ नमूद करते. त्यावर पंतप्रधानांचीही स्वाक्षरी आहे.
कलम 60 - राष्ट्रपतींच्या शपथविधीची संपूर्ण माहिती घटनेच्या या कलमात देण्यात आली आहे.
कलम 75 (4) पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या शपथेचे स्वरूप या कलमात सांगितलेले आहे.
कलम 99 मध्ये संसदेच्या सर्व सदस्यांच्या शपथेचे नियम सांगण्यात आले आहे.
कलम 124 (6) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पदाची शपथ घेण्याचे नियम दिलेले असतात.
कलम148 (8) नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या शपथविधीसाठीचे नियमांचा उल्लेख यात आढळतो.
शपथ तोडल्यास काय होते
संविधानिक पदाची शपथ घेणाऱ्या व्यक्तीने गोपनीयतेच्या शपथेचे उल्लंघन केल्यास, त्या व्यक्तीला पदावरून हटवण्यासाठी एक विशेष प्रक्रिया आहे. ज्याला महाभियोग म्हणतात. यामध्ये सामान्यत: गुन्हा नोंदविला जात नाही, परंतु जर गैरव्यवहार झाला तर गुन्हा दाखल होऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.