भारताला २१व्या शतकात नेण्यात अटलजींची महत्त्वपूर्ण भूमिका, PM मोदींनी वाहिली आदरांजली

Atal Bihari Vajpayee
Atal Bihari Vajpayee
Updated on

Atal Bihari Vajpayee : देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. किडनीच्या संसर्गामुळे आणि इतर काही आरोग्य समस्यांमुळे त्यांना 11 जून 2018 रोजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते, जेथे 16 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचे निधन झाले होते.

अटल बिहारी वाजपेयी हे एक कुशल राजकारणी तसेच एक उत्तम कवी आणि वक्ते होते. त्यांचे विचार भारतीय राजकारणालाच नव्हे, तर सर्वसामान्यांनाही मार्ग दाखवणारे आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी अटलजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.

Atal Bihari Vajpayee
Ajit Pawar : भूमिपूजनाच्या फलकावरुन अजित पवार गट अन् भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

नरेंद्र मोदी म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यात मी भारतातील 140 कोटी लोकांमध्ये सामील आहे.

अटलजींच्या नेतृत्वाचा भारताला खूप फायदा झाला. आपल्या देशाच्या प्रगतीला चालना देण्यात आणि विविध क्षेत्रांमध्ये २१व्या शतकात नेण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे मोदी म्हणाले. 

Atal Bihari Vajpayee
Pune Crime News : पुण्यात पाकिस्तान झिंदाबादचे नारे; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()