Narendra Modi : मी गरीबांना उपाशी झोपू देऊ शकत नाही; कोरोना काळातील आठवणींनी PM मोदी भावूक

Narendra Modi
Narendra Modi
Updated on

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील सागर येथे रविदास मंदिराची पायाभरणी करण्यात आली. 100 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या मंदिराचे धार्मिक आणि राजकीय महत्त्वही वाढले आहे. पीएम मोदींचा मध्य प्रदेशचा हा दुसरा दौरा आहे.

आगामी काळात राज्यात निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. यावेळी संत रविदासांच्या तत्त्वांविषयी मोदींनी आपले विचार मांडले. याशिवाय त्यांनी आपल्या सरकारचे व्हिजनही मांडले. भारताला विकसित देश बनवण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, अस आवाहनही मोदींनी केलं.

Narendra Modi
Nitin Gadkari Toyota Camry : गडकरींनी उल्लेख केलेली टोयोटाची गाडी का आहे खास? फ्लेक्स-फ्युएलचा काय होणार फायदा?

पीएम मोदी म्हणाले की, एवढ्या मोठ्या कालावधीत समाजात काही वाईट गोष्टी येणे स्वाभाविक आहे. या दुष्कृत्यांना दूर करण्यासाठी वेळोवेळी या समाजातून महापुरुषांचा उदय झाला, ही भारतीय समाजाची ताकद आहे. रविदासजी हे एक महान संत होते. ज्या काळात देशावर मुघलांचे राज्य होते त्या काळात त्यांचा जन्म झाला.

समाज अस्थिरता, दडपशाही आणि अत्याचाराने ग्रासला होता. त्यावेळीही रविदासजी समाजाचे प्रबोधन करत होते. त्यांनी वाईट गोष्टींविरुद्ध लढायला शिकवले. सध्या प्रत्येकजण जातीवादात अडकला आहे, हा रोग मानवतेला खात आहे, अशी खंत मोदींनी व्यक्त केली.

कार्यक्रमात पंतप्रधान पुढे म्हणाले की, जेव्हा आमच्या श्रद्धेवर हल्ला होत होता, आमची ओळख लपवण्यासाठी निर्बंध लादले जात होते, तेव्हा रविदासजींनी मुघलांच्या काळात देशभक्ती दाखवली होती. परावलंबन हे सर्वात मोठे पाप आहे, असे ते म्हणाले होते. एक प्रकारे त्यांनी समाजाला अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित केले.

या भावनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया घातला होता. याच भावनेने अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय भूमिका बजावली. आज याच भावनेतून भारत गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी पुढे जात असल्याचं मोदी म्हणाले.

Narendra Modi
Nitin Gadkari : भाजपमधला अंतर्गत वाद मिटणार? नितीन गडकरी मेधा कुलकर्णींच्या भेटीला

यानंतर पीएम मोदींना कोरोनाचा काळ आठवला आणि ते काहीसे भावूकही झाले. ते म्हणाले की, देशाला गरिबी आणि भूकमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोरोनाची एवढी मोठी महामारी आली, संपूर्ण जगाची व्यवस्था कोलमडली, सर्व काही ठप्प झाले होते. प्रत्येकजण भारतातील गरीब वर्गासाठी, दलित आदिवासींसाठी भीती व्यक्त करत होता.

100 वर्षांनंतर एवढी मोठी आपत्ती आल्याचे बोलले जात होते. समाजातील एक घटक कसा जगेल, असा प्रश्न होता. मात्र मी माझ्या गरीब बंधू-भगिनींना रिकाम्या पोटी झोपू देणार नाही, हे ठरवलं होतं. मित्रांनो, भूकेचा त्रास काय असतो हे मला चांगलेच माहीत आहे. गरीबांचा स्वाभिमान काय असतो हे मला माहीत आहे. मी तुमच्याच कुटुंबातील एक सदस्य आहे, तुमचे सुख-दु:ख समजून घेण्यासाठी मला पुस्तके वाचण्याची गरज पडत नाही. आम्ही 80 कोटींहून अधिक लोकांना मोफत रेशन दिले, आज या प्रयत्नांचे जगभरातून कौतुक होत असल्याचं मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.