नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (ता. १८) भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या NIIO (नेव्हल इनोव्हेशन ॲण्ड इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशन) परिसंवाद ‘स्वावलंबन’मध्ये भाग घेतला. या प्रसंगी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आत्मनिर्भर भारतावर जोर दिला. तसेच देशाच्या सैनिकांना (Soldiers) आश्वासन दिले की त्यांच्याकडे अशी शस्त्रे (weapons) असतील ज्याचा शत्रू कधी विचारही करणार नाही. (Narendra Modi Latest Marathi News)
इतर देशांच्या सैनिकांकडे (Soldiers) ती शस्त्रे असू शकतात. आपल्या क्षमतेच्या जोरावर आपले सैनिक त्या शस्त्रांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करू शकतील अशीही शक्यता आहे. परंतु, किती दिवस मी धोका पत्करत राहणार? ती शस्त्रे मी माझ्या जवानांना का देऊ, जी इतर देशांचे सैनिकही वापरत आहेत. आपल्या सैनिकांकडे अशी शस्त्रे (weapons) असतील ज्याचा शत्रूने विचारही केला नसेल. त्यांना वाटेल तोपर्यंत आमच्या जवानांनी त्यांना संपवले असेल, असेही नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.
संरक्षणाच्या बाबतीत देश आता आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या चार ते पाच वर्षांत आपली संरक्षण आयात सुमारे २१ टक्क्यांनी कमी झाली आहे. आज आपण सर्वांत मोठ्या संरक्षण आयातदाराकडून मोठ्या निर्यातदाराकडे वेगाने वाटचाल करीत आहोत, असेही पंतप्रधान म्हणाले.
गेल्या दशकांच्या दृष्टिकोनातून शिकत आज आपण एक नवीन संरक्षण परिसंस्था विकसित करीत आहोत. आज संरक्षण R&D खाजगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था, एमएसएमई आणि स्टार्ट-अपसाठी खुले करण्यात आले आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताची स्थिती खूप मजबूत होती
स्वातंत्र्यापूर्वी संरक्षण क्षेत्रात भारताची स्थिती खूप मजबूत होती. पूर्वी भारत अनेक उपकरणे निर्यात करीत असे. हॉवित्झर गन, ईशापूर रायफल फॅक्टरीत बनवलेल्या मशीनगन श्रेष्ठ मानल्या जात होत्या. आम्ही खूप निर्यात करायचो. मग असे काय झाले की एकावेळी आपण या क्षेत्रात जगातील सर्वांत मोठे आयातदार झालो, असा प्रश्नही नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.
भारतीय सैन्यात स्वावलंबनाचे ध्येय खूप महत्त्वाचे
२१ व्या शतकातील भारतासाठी भारतीय सैन्यात स्वावलंबनाचे ध्येय खूप महत्त्वाचे आहे. स्वावलंबी नौदलासाठी पहिल्या आत्मनिर्भर परिसंवादाचे आयोजन हे या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. मागच्या आठ वर्षांत केवळ संरक्षण अर्थसंकल्पातच वाढ झाली नाही तर हा अर्थसंकल्प देशातीलच संरक्षण उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल याची खात्री केली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.