सत्तेसाठी आशीर्वाद नको : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : मला सत्तेत येण्याचा आशीर्वाद नको आहे तर मी कायम जनसेवेशी जोडलेला राहू इच्छितो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाच्या 83 व्या भागात, राजेश प्रजापती या श्रोत्याशी बोलताना मोदींनी वरील भावना व्यक्त केली. या भागात मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, आपल्या सरकारच्या योजनांच्या लाभार्थींची वाढती संख्या, ऑस्ट्रेलियातील प्रेक्षणीय वृंदावन गॅलरी आदी मुद्यांवर विचार मांडले.
आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी असलेले प्रजापती यांच्याशी संवाद साधून मोदी यांनी त्यांच्या हृदयरोगाच्या समस्येवर आयुष्मान भारत कार्डमुळे झालेल्या फायद्यांबाबतची माहिती घेतली. प्रजापती यांनी आपल्याला जीवनदान मिळाले व आपण सदैव सत्तेवर रहा असे म्हणताच मोदींनी, असा आशीर्वाद मला नको असून कायम लोकांच्या सेवेत जोडलेले राहणेच आवडेल, असे उत्तर दिले.
मन की बात लोक ऐकत असल्याने सकारात्मकतेचा प्रसार होतो, असे सांगून मोदी म्हणाले की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, काही शिकण्याबरोबरच देशासाठी काही तरी करण्याची प्रेरणाही आम्हांस देतो. सध्या सामान्य लोकांपासून सरकारे, ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत अमृतमहोत्सवाची चर्चा सुरू आहे. स्वातंत्र्य चळवळीत आदिवासींचे मोठे योगदान होते.
अंदमान निकोबार बेटांवर यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जारवा व ओंगे या आदिवासी जमातीच्या कलाकारांनी उत्कृष्ट कला सादर केली.
दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात मुलांनी स्वातंत्र्य चळवळीवर सुंदर कलाकृती सादर केल्या. पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे बनविलेल्या वृंदावन गॅलरीचा उल्लेख केला. तेथील जगततारिणी यांच्या प्रयत्नांमुळे ही गॅलरी उभी राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
वादळापासून बचावासाठी
तमिळनाडूच्या तुतूकुडी येथील ग्रामस्थांनी वादळ व समुद्राच्या लाटांपासून गावाला वाचविण्यासाठी विशिष्ट प्रकारची झाडे लावली त्याचाही उल्लेख पंतप्रधानांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.