यूएस काँग्रेस सदस्याची PoK भेट म्हणजे, 'संकुचित राजकारण'

उमर यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचीदेखील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यूएस काँग्रेस सदस्याची PoK भेट म्हणजे, 'संकुचित राजकारण'
Updated on

नवी दिल्ली : अमेरिकन काँग्रेसचे सदस्य इल्हान ओमर यांच्या पाकव्याप्त काश्मीर भेटीवर परराष्ट्र खात्याने तीव्र आक्षेप घेतला आहे. ओमर यांची ही भेट 'संकुचित' राजकारणाचे प्रतिबिंब असल्याचे मतही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केले आहे. ओमर या चार दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. उमर यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचीदेखील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

बागची म्हणाले की, इल्हान ओमर यांनी पाकिस्तानच्या बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या जम्मू-काश्मीरच्या भागाला भेट दिली. अशा राजकारण्याला आपल्या देशात आपल्या संकुचित विचारसरणीचे राजकारण करायचे असेल, तर ती त्याची स्वतःची बाब आहे, पण असे करून आपल्या प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन होत असेल, तर तो चिंतेचा विषय असून, हे निंदनीय आहे.

अफगाणिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांबाबत विचारले असता ते म्हणाले की, भारत त्या देशातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. “आम्ही काही दहशतवादी हल्ल्यांच्या बातम्या पाहिल्या आहेत. भारताने नेहमीच दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला असून, तेथील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे बागची यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.