Manipur Violence : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची मणिपूर सरकारला नोटीस; महिन्याभरात अहवाल मागवला

Manipur Violence
Manipur Violenceesakal
Updated on

नवी दिल्लीः देशाला हादरवून सोडणारा धक्कादायक प्रकार मणिपूरमधून समोर आलेला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला काही महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला होता. देशभरातून या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणी आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) मणिपूर सरकारला नोटीस बजावली असून 4 मे रोजी जमावाने महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार केले, त्या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. ही घटना मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात घडली होती.

Manipur Violence
Manipur Violence :"... नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल" मणिपूर व्हिडिओवर CJI चंद्रचूड यांनी सरकारला फटकारले

या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, नाही तर आम्हाला कारवाई करावी लागेल असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

Manipur Violence
Seema Haider Vs Prasanjit : सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवण्याची तयारी मात्र प्रसनजीत भारतात कधी येणार?

मणिपूरचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नोटीस धाडून अहवाल मागवला आहे. मानवाधिकार आयोगाने नोटीसीमध्ये म्हटलंय की, नागरिकांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी, विशेषत: महिला आणि असुरक्षित घटकांना अशा प्रकारच्या रानटी घटनांपासून संरक्षण देण्यासाठी कोणती पावले उचलली जातील, याबद्दल आयोगाला जाणून घ्यायचे आहे.

दरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केल्याची माहिती दिली. आम्ही कोणालाही सोडणार नाही. सत्ताधारी भाजपचे सर्व आमदार या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतात. यात सहभागी असलेल्या सर्वांना शिक्षा देऊ, अगदी फाशीच्या शिक्षेपर्यंत जाऊ, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.