Super 30 Movie: चित्रपटांचा प्रभाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच जीवनावर होतो. लहान मुलांच्या आवडीचे चित्रपट असले की चित्रपटांसारखं खऱ्या आयुष्यातही ते अनुकरण करू पाहातात. अशाच एका चित्रपटाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत ज्याने लहान मुलांना गणिताची गोडी लावली.
हृतिश रोशनने साकारलेल्या सुपर ३० या चित्रपटाबाबत अनेकांना माहिती असेलच. अनेकांच्या मनात घर करून गेलेल्या या चित्रपटात नेमकं काय दाखवलंय हे तुम्हाला ठाऊक आहे काय?
सुपर ३० चे संस्थापक आणि गणितज्ज्ञ आनंद कुमार यांना साराभाई शिक्षक वैज्ञानिक राष्ट्रीय पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. गरीब विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत गणित शिकवून त्यांचा आयआयटी प्रवेश यशस्वी करण्यासाठी कोचिंग देण्याच्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
कुमार हे साधारण दोन दशकांपासून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना 'जेईई अँडवास' या प्रवेश परीक्षेसाठी प्रशिक्षण देत आहेत. गुजरातमधील रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशनने शिक्षकांमध्ये वैज्ञानिक विचार विकसित करण्यासाठी एनसीटीएसची स्थापना केली होती. याचे मुख्यालय दिल्लीत आहे.
सुपर ३० हा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील बायोग्राफिकल नाटक चित्रपट आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आनंद कुमारची व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट २०२१ वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ठरण्यामागे नेमंक काय खास कारण आहे ते तुम्हाला वरील आनंद कुमार यांच्या कथेतून कळालेच असेल.
मुलांना गणित या विषयाची कायमच धास्ती राहिली आहे. अशात आनंद कुमार यांनी मोफत मुलांना सोप्या भाषेत गणित शिकण्याची उत्तम अशी मोहिम सुरू केली. सुपर ३० या चित्रपटातून अनेक विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.