NSE च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना 7 दिवसांची CBI कोठडी

रविवारी रात्री चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती.
Chitra ramkrishna
Chitra ramkrishnaSakal Digital
Updated on

नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना दिल्ली न्यायालयाने सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. रविवारी रात्री चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. चित्रा रामकृष्ण यांच्यावर हिमालयातील एका कथित योगीच्या सूचनेवरून काम करणे आणि संवेदनशील माहिती देण्याचा आरोप लावण्यात आला आहे. (NSE Former CEO Chitra Ramkrishna Get CBI Custody)

Chitra ramkrishna
ओला, उबरसह इतर कंपन्यांना हायकोर्टाचा निर्वाणीचा इशारा

रामकृष्ण यांची सीबीआयने सीसीटीव्ही निरीक्षणाखाली चौकशी करण्यास न्यायालयाने म्हटले आहे. तसेच रामकृष्ण यांच्या वकिलांना दररोज संध्याकाळी भेटण्याची परवानगी देताना, चित्रा रामकृष्णाची दर 24 तासांनी वैद्यकीय तपासणी केली जाईल याची खात्री करण्याचे निर्देशही न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

सीबीआयने काही दिवसांपूर्वी एनएसईचे माज ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रम्हण्यम याला चेन्नईतून अटक केली होती. हिमालयातील योगी हा दुसरा कोणी नसून आनंद सुब्रम्हण्यम आहे, असे म्हटले जात आहे. एनएसईच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप आनंदवर आहे. एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण या आनंदच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत होत्या. सध्या आनंद सुब्रम्हण्यम सीबीआय कोठडीत आहे.

Chitra ramkrishna
चीनचे झेंडे लावा अन् रशियावर बॉम्ब फेका; ट्रम्प यांचा अजब सल्ला

चित्रा रामकृष्ण या एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात त्यांनी शेअर बाजाराशी संबंधित गोपनीय माहिती हिमालयातील एका योगीला पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला होता. चित्रा रामकृष्ण यांनी सुब्रह्मण्यम यांची मुख्य सल्लागार, ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. ही नेमणूक बेकायदा असल्याचा आरोप चित्रा यांच्यावर ठेवण्यात आला होता.

गेल्या 20 वर्षांपासून त्या संबंधित योगीच्या संपर्कात होत्या. विशेष म्हणजे त्या संबंधित योगीला कधीही भेटल्या नाहीत, असं देखील सांगितलं जातं. हे योगी कुठेही प्रकट होऊ शकतात असं चित्रांचं म्हणणं होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच चित्रा यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने नुकताच त्यांचा अर्ज फेटाळला होता.

चित्रा यांच्यापूर्वी एप्रिल 1994 ते मार्च 2013 पर्यंत नरेन हे एनएसईचे एमडी आणि सीईओ होते. नरेन यांच्या कारकीर्दीनंतर चित्रा रामकृष्ण यांची एनएसईमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह कॅटेगिरीमध्ये उपाध्यपदी नियुक्ती झाली होती. या प्रकरणाविषयी SEBI ने मोठी कारवाई करत चित्रा रामकृष्ण, रवी नारायण यांच्यासोबतच काही व्यक्तींवर ठपका ठेवलेला. याप्रकरणी सेबीने चित्रा रामकृष्ण यांना ३ कोटी, आनंद सुब्रह्मण्यम व एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नरीन यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

Chitra ramkrishna
निफ्टी सात महिन्यांच्या निचांकी पातळीवर, सेन्सेक्स 1491 अंकांनी कोसळला

को-लोकेशन गैरव्यवहार म्हणजे काय? (What is NSE Co location scam)

एनएसई को – लोकेशन गैरव्यवहारात निवडक ब्रोकरना फायदा करून देण्यात आला होता. ओपीजी सिक्युरिटीज नावाच्या ब्रोकरेज फर्मला फायदा मिळवून देण्यासाठी त्याला को-लोकेशन सुविधांमध्ये प्रवेश देण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे. या सुविधेत उपस्थित ब्रोकरना बाकीच्यांपेक्षा लवकर सर्व माहिती मिळत होती. अशा प्रकारे एनएसईवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे सीबीआयचे मत आहे.

चित्रा मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्यानंतर आणि आनंद त्यांचा जवळचा सहकारी होता. या प्रकरणात, सीबीआय त्या अज्ञात योगीचे संबंध काय आहे याचा तपास घेत आहे. त्या योगीच्या सांगण्यावरून चित्रा या ‘एनएसई’चे सर्व निर्णय घेत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.