National Voter's Day : तुमच्या मतदानाचे तुम्हालाच आहेत फायदे; जाणून घ्या कसे...

मतदान सक्तीचे करावे की नको यावर सध्या विचार सुरू आहे. मात्र, प्रत्येकाने कर्तव्य म्हणून याकडे पाहिले, तर ही वेळच येणार नाही.
National Voters Day
National Voters Dayesakal
Updated on

National Voter's Day : लोकशाहीत नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. तो केवळ हक्क राहत नाही, तर ते आता कर्तव्यही बनले आहे. मतदान करणे म्हणजे कारभारातील सक्रीय सहभाग होय. निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतदान, त्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्याची गरज आहे. मतदान सक्तीचे करावे की नको यावर सध्या खल सुरू आहे. मात्र, प्रत्येकाने कर्तव्य म्हणून याकडे पाहिले, तर ही वेळच येणार नाही.

प्रक्रियेच्या बाहेर राहून टीका करण्यापेक्षा, नाराजी व्यक्त करण्यापेक्षा मतदान करून प्रत्यक्ष सहभाग नोंदविल्याने शहराबद्दलची आत्मीयता वाढण्यास मदत होऊ शकेल. कामे होत नाहीत म्हणून नाराज झालेले नागरीक नकारात्मक बनतात. येथील राजकारण आणि एकूणच कारभार याबद्दल नकारात्मक भाव तयार होतो. आता येथे काहीच बदल होणार नाही, असा समज वाढतो जातो. ही नकारात्मक शक्तीच आपल्याला मागे घेऊन जाण्यास, अविकसित राहण्यास कारण बनू शकते.

National Voters Day
National Voter Day Motto: मतदारराजा निवडणुकीत सहभागी हो...!

त्यातून मतदानच करायचं नाही अशी मानसिकता निर्माण होऊ शकते. पण त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. आपण मतदान केले नाही म्हणून ते निवडून येत नाहीत असे नाही. उलट चुकीचा नेता निवडल्या जाण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुमचं मत महत्वाचं आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे.

National Voters Day
Voters Day : मतदान कार्ड बनवायचंय? एका क्लिकवर जाणून घ्या फंडा

काय होतात फायदे

  • प्रक्रियेच्या बाहेर राहून टीका करण्यापेक्षा, नाराजी व्यक्त करण्यापेक्षा मतदान करून प्रत्यक्ष सहभाग नोंदविल्याने आत्मीयता वाढण्यास मदत होऊ शकेल.

  • शहराच्या सत्तेत आपली मत रुपी गुंतवणुक असते.

  • योग्य नेता निवडण्यास आपलं मत महत्वपूर्ण ठरू शकतं म्हणजे आपलेच प्रश्न सुटतील.

  • शहराच्या विकासात खारीचा पण महत्वपूर्ण सहभाग असेल.

  • जर एकही उमेदवार योग्य नाही वाटला तर नोटा हा पर्याय उपलब्ध असतो. त्यात तुम्ही मत नोंदवलं तर सर्वाधिक नोटा मतांमुळे निवडणूकीला बाद ठरवता येतं.

  • जर तुम्ही मतदानच केलं नाही तर तुम्हाला प्रश्न विचारण्याचाही अधिकार उरत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.