Agneepath Scheme : आजपासून 'अग्निपथ' योजनेविरोधात देशव्यापी आंदोलन : राकेश टिकैत

आता किसान मोर्चा सैन्य भरतीतील 'अग्निपथ' योजनेला विरोध करणार आहे.
Rakesh Tikait
Rakesh Tikaitesakal
Updated on
Summary

आता किसान मोर्चा सैन्य भरतीतील 'अग्निपथ' योजनेला विरोध करणार आहे.

नवी दिल्ली : आता किसान मोर्चा (Sanyukt Kisan Morcha) सैन्य भरतीतील 'अग्निपथ' योजनेला (Agneepath Scheme) विरोध करणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांसोबतच माजी सैनिक (Indian Army) आणि युवकही सहभागी होणार आहेत. आंदोलनादरम्यान संयुक्त किसान मोर्चा, माजी सैनिकांचा संयुक्त मोर्चा आणि अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या विविध युवा संघटना संयुक्तपणे आपल्या मागण्या मांडणार आहेत. संयुक्त पत्रकार परिषदेत राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी ही घोषणा केलीय.

'अग्निपथ' विरोधात किसान मोर्चासोबत निघालेल्या इतर संघटनांची संयुक्त मोहीम 7 ते 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्याअंतर्गत विविध ठिकाणी 'जय जवान जय किसान' संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. अग्निपथ सारखी योजना म्हणजे, वर्षानुवर्षे त्यासाठी परिश्रम घेतलेल्या आणि आपल्या मेहनतीच्या अंतिम फळाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांचा विश्वासघात आहे, असं किसान मोर्चाच्या वतीनं सांगण्यात आलंय. याचा अर्थ बेरोजगार तरुणांना मोठा फटका बसेल, ज्यांना आधीच सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधींचा अभाव आहे. ज्या शेतकरी कुटुंबांनी आपल्या तरुणांना सैन्यदलात पाठवून देशासाठी योगदान दिलं आहे, त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे, असंही त्यांनी नमूद केलंय.

Rakesh Tikait
काँग्रेसला मोठा धक्का; 'हा' दिग्गज नेता भाजपच्या ताफ्यात

युनायटेड फ्रंट ऑफ एक्स-सर्व्हिसमनच्या वतीनं लष्कराची नवीन भरती योजना तरुणांच्या हिताच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं सांगण्यात आलंय. वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या घातक परिणामांबद्दल लोकांना शिक्षित करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. अग्निपथ योजना तात्काळ मागे घेण्यात यावी आणि त्याअंतर्गत जारी करण्यात आलेल्या सर्व अधिसूचना मागे घेण्यात याव्यात, अशी या मोहिमेची मागणी असल्याचंही टिकैत म्हणाले.

Rakesh Tikait
Gaza Violence : गाझामध्ये इस्रायलचा बॉम्बहल्ला; हिंसाचारात 6 मुलांसह 24 जणांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()