ISIS कनेक्शनवरून देशभरात NIAकडून छापे; महाराष्ट्राचाही सामावेश

NIA
NIACanva
Updated on

दिल्ली : दहशतवादी संघटना ISIS च्या कनेक्शनच्या संशयातून देशभरात राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडून छापेमारी सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड आणि कोल्हापूर या शहरांचा सामावेश आहे. आज NIA कडून देशभरातील 6 राज्यांमध्ये 13 संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरातून २ आणि नांदेडमधून ३ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

(NIA Raid Updates)

महाराष्ट्रातील नांदेड आणि कोल्हापूरमध्ये ही छापेमारी सुरू असून या कारवाईमध्ये ज्या लोकांचा ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून यामध्ये संशयितांकडून नवीन मुलांना या संघटनेत सहभागी करणे, त्यांची दिशाभूल करणे असे कामं केले जात होते. या प्रकरणावर तपास संस्थेची टीम अनेक दिवसांपासून काम करत होती. त्यांनंतर सर्व ठिकाणी एकाच वेळी छापा टाकण्यात आला आहे.

या संशयित लोकांकडून देशविरोधी कृत्य करण्याची योजना होती, यातून काही घातपात घडवण्याच्या योजनेला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरूंग लावण्यात आला आहे. यामध्ये अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले असून काही लोकांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

NIA
चीनकडून हेरगिरी अन् डेटा चोरी; तीन चिनी नागरिकांना नोएडातून अटक

कुठे सुरू आहे छापेमारी?

मध्यप्रदेश मधील भोपाळ आणि रायसेन जिल्हे; गुजरात मधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्हे, बिहार मधील अररिया जिल्हा, कर्नाटक मधील भटकळ आणि तुमकूर जिल्हे, महाराष्ट्र मधील कोल्हापूर आणि नांदेड जिल्हे आणि उत्तर प्रदेश मधील देवबंद जिल्हा या ठिकाणी ISIS च्या कारवायांसाठी NIA छापेमारी सुरू आहे.

NIA द्वारे आयपीसीच्या कलम 153A, आणि 153B आणि UA (P) कायद्याच्या कलम 18, 18B, 38, 39 आणि 40 अंतर्गत संशयितांवर स्व-मोटो गुन्हा नोंदवला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.