Navaratri Festival : नेदरलॅंडच्या कलाकारांमुळे खुलणार नवरात्रीचे रंग

कोलकात्यात स्थानिक कारागिरांसह देखाव्याचे काम सुरू
navratri
navratrisakal
Updated on

कोलकाता - प.बंगालमध्ये दुर्गोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. राज्याचा हा सर्वांत मोठा सण जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी नेदरलॅंडमधील दोन कलाकारही कोलकत्यात स्थानिक कारागिरांसह या वर्षीच्या देखाव्यावर काम करत आहेत. मार्टिना मारिया पेकाला आणि आणि बेंजामिन व्हॅन होइज शिल्थॉवर पोम्पे अशी या परदेशी कलाकारांची नावे आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीला त्यांचे कोलकत्यात आगमन झाले.

तेव्हापासून ते कोलकत्यातील ‘बेहला नूतन दाल’ या दुर्गा मंडळाचे स्थानिक कारागीर अयन साहा यांच्यासोबत काम करत आहेत. भारतीय आणि डच कलाकारांच्या संगमात आम्ही दुर्गापूजा साजरी करू, अशा भावना साहा यांनी व्यक्त केल्या. कोलकत्यातील ‘मासआर्ट’ या सामाजिक व सांस्कृतिक संघटनेने नेदरलॅंडमधील दोन कलाकारांची निवड केली. दुर्गापूजेच्या विधीसंदर्भात मासआर्टने युनेस्को आणि ब्रिटिश कौन्सिलशी संयुक्त करार केला आहे.

‘मासआर्ट’चे उपाध्यक्ष सायंतन मित्रा म्हणाले, की मारिया आणि बेंजामिन हे दोघेही नेदरलॅंडमधील नामांकित कला संस्थेचे माजी विद्यार्थी असून बंगालच्या समकालीन कलेच्या तज्ज्ञाने त्यांची निवड केली. बेहला नूतन दाल मंडळ यंदा तुष्टी हा देखावा साकारला असून बंगालमधील लोकप्रिय स्ट्रीट फूड फुचकाच्या सेवनानंतर लोकांना मिळणारे समाधान दाखविण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला, असेही त्यांनी नमूद केले.

navratri
Solapur : दोन बंदूक, पाच गोळ्यांसह तरुणाला पोलिसांकडून अटक

भारतीय-डच कलाकारांच्या सहकार्याबद्दल बोलताना मासआर्टचे सचिव ध्रुवज्योती बोस शुबो म्हणाले, की जेव्हा दोन वैविध्यपूर्ण संस्कृती एकमेकांत मिसळतात तेव्हा कला ही त्यांना एकत्र करणारी वैश्विक भाषा बनते. आमची संघटना सांस्कृतिक मिश्रणाच्या सौंदर्याचा पुरावा आहे. नेदरलॅंडचे चैतन्यदायी रंग भारताच्या समृद्ध वारशात मिसळून ते दुर्गेची स्त्री शक्ती साजरी करणारा एक उत्कृष्ट नमुना बनले आहेत, असेही त्यांनी सांगितले. प.बंगालमधील दुर्गापूजा देश-परदेशात प्रसिद्ध असून युनेस्कोने २०२१ मध्ये कोलकत्यातील दुर्गापूजेचा अमूर्त सांस्कृतिक वारशानै गौरव केला होता.

navratri
Chh. Sambhaji Nagar : लिचेडच्या घाण पाण्यामुळे पिके करपली

आम्ही दुर्गापूजेच्या देखाव्यात व्हिडिओ आणि ॲनिमेशनशी संबंधित घटकांवर काम करत आहोत. त्यामुळे, मंडपाच्या प्रवेशद्वारातूनच भाविकांना देखावा पाहता येईल. हा आमच्यासाठी खूपच वेगळा व मौल्यवान अनुभव होता. कोलकत्यातील कारागीर अयन साहा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवही रोमांचकारी होता. या अद्‌भुत प्रक्रियेचा भाग बनता आल्याचा आम्हाला अभिमान आहे.

मार्टिन, बेंजामिन, नेदरलॅंडचे कलाकार

navratri
Nanded Hospital News : भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाला किंमत नाही; राहुल गांधींची भाजपवर टीका!

२४ दुर्गापूजांची निवड

कोलकत्यातील गर्दी होणाऱ्या एकूण २४ दुर्गापूजांची मासआर्ट या संस्थेने नवरात्रोत्सवापूर्वीच्या ‘प्रिव्ह्यू शो’ साठी निवड केली आहे. त्यात, बेहला नूतन दालच्या दुर्गापूजेचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे, दोन घरगुती दुर्गापूजांचीही निवड करण्यात आली आहे. दुर्गापूजेपूर्वीच्या कार्यक्रमांना भाविक, कलाप्रेमी, पर्यटक तसेच राजनैतिक अधिकारीही उपस्थित असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com