पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत सिद्धू म्हणाले,तुम्हाला 15 मिनिटे थांबावे लागले तर...

नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे.
PM Narendra Modi,Navjot Singh Sidhu
PM Narendra Modi,Navjot Singh SidhuEsakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची बुधवारी पंजाबमधील फिरोजपूर (Ferozepur in Punjab)येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ही सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून पडला होता. सुरक्षेच्या कारणस्तव पंतप्रधान मोदींना पुन्हा भटिंडा विमानतळावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला.यावरून भारतात गदारोळ सुरु आहे.पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत काँग्रेस (Congress)नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu)यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. (Navjot Singh Sidhu React PM Narendra Modi Security)

नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. एका रॅलीत संबोधित करताना सिध्दू म्हणाले, 'पंतप्रधान साहेब, मला विचारायचे आहे की आमचे लोक दीड वर्ष दिल्लीत बसले. दिल्लीला लंगर खाऊ घातलं. तेव्हा तुमचा मिडिया काही बोलला नाही, पण तुम्हाला १५ मिनिटे थांबावे लागले लगेच त्यांना त्याचा त्रास झाला. असा उपरोधक टोला लगावला आहे.

Summary

'पंतप्रधान साहेब, मला विचारायचे आहे की आमचे लोक दीड वर्ष दिल्लीत बसले. दिल्लीला लंगर खाऊ घातलं. तेव्हा तुमचा मिडिया काही बोलला नाही...

काँग्रेसचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, 'ही पंजाबच्या शेतकऱ्यांची ताकद आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करेन, असे तुम्ही म्हणाला होता. दुप्पट उत्पन्न घेऊन काय केले? त्याच्यांच खिशातंल हिसकावून घेतले. आता तुम्ही कितीही नाटक करा, लोकांना काही फरक पडणार नाही. तुमचेच लोक फोटो लावून कायदा मागे घ्या म्हणत आहेत. तुम्ही काळे कायदे मागे घेतले नाहीत मात्र आम्ही गळ्यात अंगठा घालून घडवून आणलं.

नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले, इतकंच नाही तर रॅलीत खुर्च्या रिकाम्या राहिल्यानं भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा मुद्दा उचलून धरला आहे.

पुढे ते म्हणाले, कार्यक्रमासाठी 70,000 खुर्च्या लावण्यात आल्या होत्या, मात्र 700 लोक घटनास्थळी पोहोचले. पंजाब काँग्रेसने '700 कुर्सी 700 बंदे' हॅशटॅग वापरुन ट्विट केले होते. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची खिल्ली उडवत फ्लॉप रॅलीवरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचं म्हटलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा (Pawan Khera)म्हणाले, 'भगवान के लिए सुरक्षा बलों का मनोबल न गिराएं। पंजाबच्या शूर भूमीचा अपमान करू नका. तुमच्या क्षुल्लक राजकारणासाठी तुम्ही संपूर्ण प्रदेश आणि तेथील संस्कृतीला दोष देऊ शकत नाही.

'कॅप्टन अमरिंदरसारखा निर्लज्ज माणूस मी पाहिला नाही'

शेवटी, 500 लोकांच्या रॅलीला तुम्ही कसे संबोधित कराल? ही लाजिरवाणी गोष्ट टाळण्यासाठी त्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. नवज्योतसिंग सिध्दू यांनीही कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh)यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, मी माझ्या आयुष्यात इतका निर्लज्ज नेता पाहिला नाही.केवळ 500 लोकांच्या रॅलीसाठी पोहोचले. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पर्दाफाश झाला आहे. असे ही सिद्धू म्हणाले.

काल कॅप्टन अमरिंदर आणि भाजप अपयशी ठरले आहेत. एकीकडे पंतप्रधानांचे म्हणणे ऐकण्यासाठी फक्त 500 लोक आले होते, तर सरदार कंवल सिंह ढिल्लन यांच्या सांगण्यावरून 20 ते 30 हजार लोक बर्नाला येथे पाहचले होते. फक्त कल्पना करा की या लोकांना काय बनायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.