पंजाबमध्ये खळबळ माजवणारा सिद्धू-अमरिंदर यांच्यातील वाद काय?

नवज्योत सिंग सिद्धूंचा राजीनामा, तर अमरिंद सिंग सुद्धा दिल्लीत.
Navjot Singh Sidhu and Amarinder Singh Clashes
Navjot Singh Sidhu and Amarinder Singh Clashes Team eSakal
Updated on

कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, मोठ्या गोंधळानंतर चरणजित सिंग यांची मुख्यमंत्री पदी निवड, अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांची नाराजी आणि यानंतर नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांचा काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चा सुरु असतानाच अचानकपणे सिद्धू यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एक राजकीय भुकंप झाला आहे. सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या वेगवेळ्या घटनांमधून समोर येताना दिसतो आहे.

अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद काय आहेत?

नवजोत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग त्यांचा विरोध करताना दिसत होते. नवज्योत सिंग सिद्धू हा व्यक्त अत्यंत धोकादाय असून, त्यांचे इम्राण खान आणि पाकिस्तानशी असलेले संबंध धोक्याचे असल्याचे म्हणत अमरिंदर सिंग यांनी त्यांच्यावर अनेकवेळा टीका केली आहे.

नवजोत सिंग सिद्धू यांची पाकिस्तानबद्दलची भुमिका, इम्राण खान, कमर जावेद बाजवा यांच्यातील संबंधांवर सिद्धू यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. सिद्धू इम्रान खान यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानला गेले होते तेव्हा अमरिंदर सिंग यांनी त्यांना विरोध करत काँग्रेसला सल्ला दिला होता. पाकिस्तानमध्ये जाऊन सिद्धू यांनी इम्रान खान यांची प्रशंसा केली होती, एवढ्यावरच न थांबता त्यांनी तत्कालीन लष्कर प्रमुख कमर जावेद नाही, तर देशाच्या लष्करप्रमुखांनाही आलिंगन दिले होते. जेव्हा सिद्धू परत आल्यावर अमरिंदर यांनी त्यांना पाकिस्तान दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला होता. तेव्हा माझा कर्णधार अमरिंदर सिंग नाही तर राहूल गांधी आहे. असे सिद्धू म्हणाले होते असे सांगण्यात येते.

Navjot Singh Sidhu and Amarinder Singh Clashes
अमरिंदर सिंगांवर भाजपचं प्रेम; पंजाबमध्ये 'लोटस'चा नवा गेम?

जानेवारी २०२१ मध्ये अमरिंदर सिंग हे पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री असतानासुद्धा नवज्योत सिंग सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं होतं. अमरिंदर सिंग यांनी त्यावेळी सिद्धू यांनी आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असे आवाहान केलं होतं. यासह अनेक वेळा सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यातील वाद समोर आले आहेत.

Navjot Singh Sidhu and Amarinder Singh Clashes
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; सिद्धूंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर या दोघांच्या वादात आणखीच भर पडत गेली. नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करताना देखील दोघांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. अमरिंदर सिंग यांनी तर थेट सिद्धूंना काही केल्या मुख्यमंत्री होऊ देणार नाही, तसे होत असेल तर त्यांना विरोध करण्यासाठी सर्व प्रयत्न करु असे स्पष्ट केले आहे. अमरिंदर सिंग हे काँग्रेसमधील मोठे नेते असून मुख्यमंत्री राहिले आहेत, तर सिद्धू यांना देखील मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यातला वादामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ निर्माण होत असल्याचे दिसते आहे. येणाऱ्या काळात या वादामुळे काँग्रेस आणि पंजाबच्या राजकारणात मोठे बदल घडून येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.