सिद्धू पाक लष्करप्रमुखांचे मित्र; CM पदासाठी माझा विरोध: अमरिंदर

सिद्धू पाक लष्करप्रमुखांचे मित्र; CM पदासाठी माझा विरोध: अमरिंदर
Updated on

चंदीगढ: मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. आपला राजीनामा सोपवल्यानंतर मुख्यमंत्री पदी नवज्योत सिंग सिद्धू यांना घेऊ नये, असं त्यांचं मत आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलंय की, मी देशाच्या भल्यासाठी त्यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे.

सिद्धू पाक लष्करप्रमुखांचे मित्र; CM पदासाठी माझा विरोध: अमरिंदर
अमरिंदर सिंग यांच्यानंतर पंजाबचा 'कॅप्टन' कोण? दोन नावे चर्चेत

कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, देशाच्या भल्यासाठी मी नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद देण्याला माझा विरोध असेल. कारण हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे त्यांचे मित्र आहे. तसेच सिद्धू यांचे पाकिस्तानचे आर्मी प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे माझा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध असेल.

सिद्धू पाक लष्करप्रमुखांचे मित्र; CM पदासाठी माझा विरोध: अमरिंदर
जगावेगळे! तब्बल 12 वर्षांपासून 'ही' व्यक्ती रोज झोपते फक्त 30 मिनिटेच

ते म्हणाले की, नवज्योत सिंग सिद्धू हा एक अक्षम माणूस आहे. ते एक आपत्ती ठरणार आहेत. पुढील मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांच्या नावाला माझा विरोध आहे. कारण त्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत. त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला हा मोठा धोका असेल.

राजीनाम्याबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी काय म्हणाल्या याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी जेंव्हा सकाळी माझ्या राजीनाम्याबाबत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन बोललो तेंव्हा त्या मला 'माफ करा अमरिंदर' असं म्हणाल्या.

सिद्धू पाक लष्करप्रमुखांचे मित्र; CM पदासाठी माझा विरोध: अमरिंदर
...तर राहुल गांधींना लवकरात लवकर अध्यक्ष करा - शशी थरुर

मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज सायंकाळी राजीनामा दिला आहे. पंजाबचे ते दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिले होते. गेल्या काही दिवसांपासून पंजाबच्या राजकारणात सातत्याने धुसफूस चालू आहे. अंतिमत: त्याची परिणीती आता मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यात झाली आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर अमरिंदर सिंग यांनी राजीनामा सूपर्द केला आहे. आपल्या राजीनाम्यामागचं कारण स्पष्ट करताना त्यांनी म्हटलंय की, ज्या प्रकारे बोलणं झालं त्यावरून मला अपमानित झाल्यासारखं वाटलं आहे. आज सकाळी मी काँग्रेसच्या अध्यक्षांशी बोललो आहे आणि मी त्यांना सांगितलंय की आज मी राजीनामा देतो आहे. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा याप्रकारे घडतंय. तीन वेळा त्यांनी आमदारांना दिल्लीत बोलवून मीटिंग केली. म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.