INDIA : 'आप'सोबतच्या आघाडीमुळं पंजाब काँग्रेसमध्ये खदखद! सिद्धू यांनी स्पष्ट केली भूमिका

navjyot siddhu
navjyot siddhu
Updated on

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. मात्र पंजाब काँग्रेसमध्ये अजुनही आम आदमी पक्षासोबत युती करण्याबाबत मतभेद दिसून आले आहे. यावरून काँग्रेसनेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पक्ष हायकमांडचा निर्णय सर्वोच्च असल्याचं म्हटलं आहे.

navjyot siddhu
India vs Bharat : देशाच्या नावावरून संकुचित राजकारण! न्यायालयानेच दखल घ्यावी; मायावतींची भूमिका

पंजाबमध्ये आम आदमी पक्षा (आप) सोबतच्या युतीला राज्यातील काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया आली. राज्यातील सत्ताधारी पक्ष AAP सोबत युतीबाबत पंजाब काँग्रेसच्या नेत्यांकडून घेण्यात असलेल्या आक्षेपावर सिद्धू यांनी भूमिका स्पष्ट केली.

navjyot siddhu
CM Shinde News : CM शिंदेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा! सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली

सिद्धूने यांनी ट्विटरवर म्हटलं की, पक्षाच्या हायकमांडचा निर्णय सर्वोच्च आहे. हे एका चांगल्या कारणासाठी आहे. राज्यघटनेच्या भावनेचा आदर करण्यासाठी राष्ट्रीय हिताला सर्वोच्च ठेवण्यात आले आहे. आपल्या लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी स्वार्थी राजकारण सोडून दिलं पाहिजे. निवडणुका फक्त पुढच्या टर्मसाठी लढल्या जात नाहीत, त्या पुढच्या पिढीसाठी लढल्या जाता आहेत. जय हिंद. जुडेगा भारत!

पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांनी मंगळवारी म्हटलं होतं की ते पंजाबच्या सर्व 13 लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.