राजकारणात कॉमेडी झाली, सिद्धू आता काय करणार?

पंजाबमध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवाला अनेकांनी सिद्धूंना जबाबदार धरलं आहे.
Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu Team eSakal
Updated on

अमृतसर: पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पाचही राज्याच्या प्रदेश अध्यक्षांना राजीनामे मागितले. त्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही सोनिया गांधींकडे एका ओळीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते आता पुन्हा क्रिकेट कॉमेंट्री करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चा सुरु असतानाच सिद्धूंमुळे (Navjot Singh Sidhu) काँग्रेसचं नुकसान झालं असल्याचं देखील राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

नवज्योत सिंग सिद्धू यांची काँग्रेसमधली एन्ट्रीच वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या येण्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग देखील होते. याच सर्व वादादरम्यान, काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गृहकलह निर्माण झाला, त्यानंतर अमरिंद सिंग यांनी राजीनामा दिला आणि ते पक्षाचे बाहेर पडले, पंजाबचा मुख्यमंत्री होण्याची आपली महत्वकांक्षा पुर्ण होईल असं सिद्धूंना वाटलं होतं, मात्र त्यांच्याऐवजी चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. त्यानंतर काही काळ सिद्धूंनी चरणजित सिंग चन्नी यांच्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. मात्र तरीही येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलं जाईल अपेक्षा त्यांना होती. मात्र काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांना डावलून चन्नी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलं. त्यामुळे सिद्धूंचा भ्रमनिरास झाला.

Navjot Singh Sidhu
दिल्ली दंगलीत झालेली भावाची हत्या; 'आप' सरकारनं दिली सरकारी नोकरी

काँग्रेसच्या गृहकलहाचा परिणाम पक्षाच्या राजकीय प्रतिमेवर झाला. 2017 च्या निवडणुकीत तब्बल ७७ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत फक्त १७ जागा मिळाल्या. यामध्ये स्वत: नवज्योत सिंग सिद्धू यांना देखील अमृतसरमधील आपल्या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. पक्षाच्या या पराभवासाठी अनेकांनी सिद्धू जबाबदार असल्याचं म्हटलं. खदुर साहिबचे काँग्रेसचे खासदार जसबीर सिंग गील यांनी पक्षाच्या नेत्यांचा अहंकार यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं. तर माजी कॅबीनेट मंत्री तृप्त राजेंद्र सिंग बाजवा यांनी देखील सिद्धूंचं बेशीस्त वागणं पक्षाच्या पराभवासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

Navjot Singh Sidhu
पराभवानंतर सोनिया गांधींनी सोपवली 'या' नेत्यांकडं 5 राज्यांची जबाबदारी

माजी मुख्यमंत्री हरचरण सिंग ब्रार यांचे सल्लागार आणि राजकीय राजकीय विश्लेषक मनोहर लाल शर्मा म्हणाले, "राजकारणात कोणतंही उज्ज्वल भविष्य दिसत नसल्याने, सिद्धू पुन्हा आपल्या रीएअॅलीटी शो आणि क्रिकेट समालोचना व्यवसाय पुन्हा सुरू करू शकतात." कारण काँग्रेस कदाचित त्यांना आता मोठ्या पदावर ठेऊ इच्छित नाही. तसंच इतर पक्ष देखील त्यांना, प्रवेश देण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत असं दिसतंय. त्यामुळे आता सिद्धू नेमकं काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()