नवज्योतसिंग सिद्धूंची अखेर सुटका! दहा महिन्यांनंतर तुरुंगातून आले बाहेर Navjot Singh Sidhu Walk Out

Navjot Singh Sidhu Walk Out
Navjot Singh Sidhu Walk Outesakal
Updated on

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची पटियाला तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. रोड रेज प्रकरणी सिद्धूला एक वर्षाची शिक्षा झाली होती. मात्र शिक्षेचं एक वर्ष पूर्ण होण्याआधी त्यांची सुटका करण्यात आली आहे. सुमारे 48 दिवस अगोदर त्यांची सुटका करण्यात आली आहे. यावेळी कारागृहाबाहेर त्यांच्या समर्थकांची गर्दी दिसून आली. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांनी शुक्रवारीच दोन भावनिक पोस्ट टाकल्या. जे खूप व्हायरल होत आहेत.

तुरुंगाच्या नियमानुसार सुटका

1990 च्या रोड रेज प्रकरणी 19 मे 2022 रोजी नवज्योत सिंग सिद्धू यांना न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना पटियाला तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र आज सुमारे ४८ दिवसांपूर्वी त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगाच्या नियमानुसार कैद्यांना दर महिन्याला ४ दिवसांची रजा दिली जाते. मात्र एक वर्षाच्या शिक्षेदरम्यान सिद्धूने एकही दिवस सुट्टी घेतली नाही, त्यामुळे त्यांची लवकर सुटका झाली.

काय होते 1988 चे प्रकरण

हे प्रकरण डिसेंबर 1988 चे आहे. पटियाला येथे कारने जात असताना सिद्धूने ज्येष्ठ नागरिक गुरनाम सिंग यांना धडक दिली होती. तसेच रागाच्या भरात सिद्धूने त्यांना धक्काबुक्कीदेखील केली त्यानंतर गुरनाम सिंह यांचा मृत्यू झाला होता. या सर्व घटनेनंतर पटियाला पोलिसांनी सिद्धू आणि त्याचा मित्र रुपिंदर सिंग यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.

1999 मध्ये ट्रायल कोर्टाने सिद्धूची निर्दोष मुक्तता केली होती, पण पंजाब हरियाणा हायकोर्टाने 2006 मध्ये सिद्धूला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सिद्धू तेव्हा अमृतसरमधून भाजपचे खासदार होते. शिक्षेनंतर त्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर सिद्धूने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.