Asaduddin Owaisi: ओवैसींची खासदारकी रद्द करा! नवनीत राणा यांचं थेट राष्ट्रपतींना पत्र

ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्यासाठी नवनीत राणा यांनी काही मुद्दे आपल्या पत्रातून मांडले आहेत या मुद्द्यांच्या आधारे खासदारकी रद्द करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi
Updated on

नवी दिल्ली : एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी अमरावती लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडं केली आहे. यासाठी त्यांनी सविस्तर पत्र लिहिलं आहे. (Navneet Rana direct letter to the President for invoke of of Asaduddin Owaisi is Member of Parliament )

राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?

नवनीत राणा यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, आदरणीय महोदय, खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला प्रार्थना करते की,

1) 26 जून 2024 रोजी असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली, ते 09 हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

२) शपथ घेतल्यानंतर लगेचच त्यांनी लोकसभा सभागृहात 'जय पॅलेस्टाईन' अशी घोषणा दिली.

3) पॅलेस्टाईन हा एक बाहेरचा देश आहे ज्याचा कोणत्याही भारतीय नागरिकाशी किंवा भारतीय संविधानाशी संबंध नाही.

4) भारतीय राज्यघटनेच्या कलम 102 नुसार, संसदेचा कोणताही सदस्य इतर कोणत्याही राष्ट्राशी आपली निष्ठा व्यक्त करू शकत नाही किंवा जर त्यानं पदावर दृढनिश्चय दाखवला किंवा असं कृत्य केलं तर त्याचं संसदेचं सदस्यत्व रद्द केलं जाऊ शकतं.

Asaduddin Owaisi
Thackeray-Fadnavis Meet: "ना ना करते प्यार, तुम्ही से...."; फडणवीसांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंच स्पष्टीकरण

५) असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर लगेचच 'जय पॅलेस्टाईन'चा नारा देऊन या राष्ट्राप्रती आपली निष्ठा, जिद्द आणि आपुलकी दाखवली आहे. जे संविधानाचे उल्लंघन आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठीही घातक ठरू शकतं.

6) देशाची एकता आणि अखंडता राखणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. संसद सदस्य असूनही ओवैसी यांनी या नियमाचं खुलेआम उल्लंघन केलं आहे, त्यामुळं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे.

8) कलम 102 1(m) नुसार, जर कोणत्याही व्यक्तीनं इतर कोणत्याही राष्ट्रासाठी आपली निष्ठा किंवा दृढनिश्चय व्यक्त केला, तर तो संसद सदस्य म्हणून काम करत नाही.

त्यामुळे या निवेदनाद्वारे मी आपल्याला विनंती करते की, असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत केलेलं हे विधान देशविरोधी कृत्य आहे, जे भारताची एकता, अखंडता आणि अंतर्गत सुरक्षेसाठी घातक ठरू शकतं. त्यामुळं सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया कलम 103 नुसार भारतीय निवडणूक आयोगाचं मत मागवून या प्रकरणाची चौकशी करून ओवैसी यांचं संसद सदस्यत्व नाकारण्यात यावं. आपण योग्य ती कारवाई करावी ही विनंती.

धन्यवाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.