नवी दिल्ली : आयएनएस विक्रांंत ही स्वदेशी युध्दनौका आज भारतीय नौदलात सामील झाली त्याच वेळी आणखी एक महत्वाची घटना घडली असून नौदलाला नवा ध्वजही मिळाला आहे. आणि या ध्वजाच्या डाव्या कोपऱयात वर असलेले नौदलाचे मानचिन्ह (क्रेस्ट) थेट छत्रपती शिवरायांच्या अष्टकोनी राजमुद्रेबरोबर नाते सांगणारे आहे. स्वातंत्र्यानंतर अपवाद वगळता नौदलाच्या ध्वजावर १९४७ पासून चिकटलेला असलेला सेंट जॉर्ज क्रॉस आता हद्दपार झाला असून त्याजागी तिरंगा व नवीन चिन्ह नौदलाच्या ध्वजावर विराजमान झाले आहे.
भारताच्या युद्धनौका, नौदल तळ आणि नौदल विमानतळांसह देशभरातील नौदलाच्या साऱया कार्यालयावर आता तूर्तास नवीन ध्वज फडकेल. तूर्तास म्हणण्याचे कारण असे की भाजपेतर सरकार येताच नौदलाच्या ध्वजावर पुन्हा हा लाल-पांढरा क्रॉस विराजमान होतो हा पूर्वेतिहास आहे.
'शंनो वरुण:'( पाण्याची देवता वरुण आपल्यासाठी शुभ ठरो) हे घोषवाक्य असलेल्या भारतीय नौदलाचा अधिकृत ध्वज मात्र अपवाद वगळता ७५ वर्षे गुलामीचेच चिन्ह मिरवीत होता. ‘ आपल्याला मनाच्या कोपऱयात असलेला गुलामीचा अखेरचा अंशही उपटून फेकून द्यायाचा आहे‘ असे यंदा लाल किल्ल्यावरून सांगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आयएसी विक्रांत' या स्वदेशी नौकेचा समावेश करतानाच नौदलाच्या नव्या ध्वजाचेही अनावरण केले आणि ब्रिटीशकालीन गुलाम मानसिकतेच्या आणखी एका प्रतीकातून देशाला मुक्तता मिळाली.
ब्रिटीशांचे राज्य असलेल्याऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आदी बहुतेक देशांनी स्वातंत्र्यानंतर त्यांच्या नौदलाचे ध्वजचिन्ह बदलले. मात्र भारतीय नौदलाच्या ध्वजावर ११ व्या शतकातील धर्मप्रसारक सेंट जॉॅज याचा क्रॉस कायम होता. अटलबिहारी वाजपेयी सरकारने २००१ मध्ये नौदलाच्या ध्वजचिन्हात बदल केला मात्र कॉंग्रेसच्या यूपीए सरकारने २००४ मध्ये त्यावर पुन्हा सेंट सेंट जॉर्ज क्रॉस ची प्रतिष्ठापना केली.स्वातंत्र्य मिळाल्यापासून नौदलाचे बोधचिन्ह चार वेळा बदलण्यात आले आहे. आता त्यावरील क्रॉस हद्दपार झाला असून छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेप्रमाणेच अष्टकोनी आकारातील निळे प्रतीकचिन्ह या ध्वजावर आले आहे.
पूर्वेतिहास काय सांगतो -
- २ ऑक्टोबर १९३४ रोजी भारतीय नौदलाचे ‘रॉयल इंडियन नेव्ही‘ असे करण्यात आले. फाळणीनंतर भारताच्या नौदलाचही विभागणी रॉयल इंडियन नेव्ही आणि रॉयल पाकिस्तान नेव्ही अशी करण्यात आली.
- २६ जानेवारी १९५० ला नौदलाच्या नावातून रॉयल हा शब्द काढून टाकण्यात आला आणि त्याचे नाव भारतीय नौदल (इंडियन नेव्ही) करण्यात आले.
- याच वेळी नौदलाच्या ध्वजाच्या वरच्या कोपऱ्यातील ब्रिटीश ध्वज काढून त्याजागी तिरंगा लावण्यात आला होता. पण सेंट जॉॅजर् क्रॉस कायम ठेलवण्यात आला. त्यामागील कारण स्पष्ट नाही.
- अटलबिहारी बाजपेयी सरकारच्या काळात नौदल ध्वजावरील डाव्या कोपऱ्यातील तिरंगा कायम ठेवताना हा क्रॉस काढून टाकण्यात आला.
-२००४ मध्ये केंद्रात सत्तांतर होताच मध्ये सेंट जॉर्ज क्रॉस पुन्हा आला. त्यावेळी मध्यभागी अशोक स्तंभाचा समावेश करण्यात आला.
- २०१४ मध्ये चौथ्यांदा आणखी एक बदल करून अशोक स्तंभाच्या खाली ‘सत्यमेव जयते‘ लिहिण्यात आले.
- २ सप्टेंबर २०२२ - नौदल ध्वजावरील सेंट जॉर्ज क्रॉस काढून निळे अष्टकोनी प्रीतकचिन्ह लावण्यात आले.
शिवरायांची प्रेरणा....
नौदलाच्या नवीन ध्वजात वरच्या कोपऱ्यावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. दुसर्या अर्ध्या भागात नौदलाची शिखा आहे. हे निळे चिन्ह अष्टकोनाच्या आकारात आहे, जे भारतीय नौदलाची चारही दिशा आणि चार कोन म्हणजे आठ दिशा दाखवते. या अष्टकोनी बोधचिन्हाच्या खाली देवनागरीत त्याखाली 'शं नो वरुण:' हे नौदलाचे ब्रीदवाक्य कोरण्यात आले आहे. नौदलाचे हे नवे प्रतीकचिन् थेट शिवाजी महाराजांशी नाते सांगणारे आहे. भारतातील पहिल्या आरमाराची स्थापना करताना शिवरायांनी ६० लढाऊ जहाजे आणि ५००० मावळ्यांसह सागरी मार्गाने भारतात घुसणाऱया घुसखोरांना पहिल्यांदा आव्हान दिले.
१९५० युनियन जॅक बदलून नौदलाच्या ध्वजचिन्हात तिरंगा जोडण्यात आला.
२००१ सेंट जॉर्ज रेड क्रॉस नौदलाच्या ध्वजावरून काढून टाकला.
२००४ सेंट जॉर्जचा रेड क्रॉस नेव्हीच्या चिन्हावर परतला.
२०१४ अशोक चिन्हाखाली सत्यमेव जयते देखील लिहिले गेले होते.
२०२२ क्रॉस काढून‘क्रेस्ट' समाविष्ट करण्यात आले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.