जिला शोधण्यासाठी नौदलानं करोडो खर्च केले; 'ती' सापडली बॉयफ्रेन्डसोबत!

संबंधीत महिला पतीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विशाखापट्टणमच्या समुद्रावर गेली होती, तिथून ती गायब झाली होती. वाचा सविस्तर वृत्त....
Coastguard_Navy
Coastguard_Navy
Updated on

ही बातमी वाचल्यानंतर कदाचित तुम्ही डोक्यावर हात मारुन घ्याल! याचं कारणही तसंच आहे. एका विवाहित तरुणीनं आपल्या पती आणि सैन्याला असा काही गुंगारा दिलाय की तुम्हीही चाट पडालं. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं हा प्रकार घडला आहे. या तरुणीलाला शोधण्यासाठी नौदलनं तब्बल १ कोटी रुपये खर्च केले. अखेर ती सापडली आपल्या बॉयफ्रेन्डसोबत!

काय घडलं नक्की?

आंध्र प्रदेशातील एक २३ वर्षीय विवाहित तरुणी सोमवारी विशाखापट्टणम इथल्या आरके बीचवर आपल्या पतीसोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. यावेळी या दाम्पत्यानं पहिल्यांदा सिंहाचलम मंदिरात देवाचं दर्शन घेतलं आणि ते बीचवर गेले. त्यानंतर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये काही फोटो आणि व्हिडिओही काढले.

Coastguard_Navy
दहिहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, तिच्या पतीच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला आणि तो बोलण्यात व्यस्त झाला. पण हाच डाव साधत त्याच्या पत्नीनं पळ काढला. फोनवरील बोलणं झाल्यानंतर तिच्या पतीनं तिला सगळीकडं खूप शोधण्याचा प्रयत्न केला. तिला फोनही केला, पण उपयोग झाला नाही. त्यानंतर वैतागलेल्या पतीनं अखेर स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेत पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली. तसेच आपल्या घरच्यांसह पत्नीच्या घरीही कल्पना दिली.

Coastguard_Navy
अमेरिकेची अर्थव्यवस्था गडगडली; आगामी काळात मंदीचे संकेत?

पोलिसांनी शंका उपस्थित केली की, संबंधित तरुणी कदाचित समुद्राच्या वेगवान लाटेसोबत वाहून गेली असावी. त्यानुसार पोलीस आणि नौदलानं तटरक्षकदलाच्या मदतीनं समुद्रात तिचा शोध सुरु केला. तिला शोधण्यासाठी मच्छिमार आणि पाणबुड्यांना पाचारण करण्यात आलं. या शोध मोहिमेसाठी नौदलाला ३ जहाज आणि एका हेलिकॉप्टरची गरज भासली. इतक करुनही बेपत्ता तरुणीचा पत्ता लागत नव्हता.

Coastguard_Navy
Indigo : मोठा अपघात टळला! टेकऑफवेळी रनवेवर जाताना चिखलात रुतलं विमान

दरम्यान, जोरदार शोधमोहिम राबवल्यानंतर अचानक या प्रकरणानं नवं वळण घेतलं. संबंधीत मुलीनं आपल्या आईला मोबाईलवर एक मेसेज पाठवला आणि माहिती दिली की, ती आपल्या बॉयफ्रेन्डसोबत नेल्लूर इथं गेली आहे. तसेच आपल्या बॉयफ्रेन्डविरोधात कोणतीही कारवाई न करण्याची विनंती देखील केली. या माहितीवरुन पोलिसांनी तिचा ठावठिकाणा निश्चित केला. पण तिला शोधण्याच्या कामात नौदलाला दोन दिवसांहून अधिक काळ लागला. यासाठी ३ जहाजं आणि एका हेलिकॉप्टर, शोधपथकासाठी तब्बल १ कोटी रुपये खर्च आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.