'अग्निपथ योजने'अंतर्गत महिलांनाही संधी, नौदलात होणार भरती

महिलांना नौदलात नोकरीची संधी
Indian navy jobs
Indian navy jobsesakal
Updated on

नवी दिल्ली : नौदलात महिला खलाशींची प्रथमच अग्निपथ योजनेत या वर्षी भरती केली जाणार आहे. यौद्धनौकांवर त्यांना तैनात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा तीन हजार महिलांची नौदल (Indian Navy) अग्निवीर म्हणून भरती केली जाईल. पहिली तुकडी ही १०-२० टक्क्यांची राहिल. त्यांचे प्रशिक्षण ओडिशातील (Odisha) आयएनएस चिल्का येथील आस्थापनेत २१ नोव्हेंबरपासून सुरु होईल. (Navy Will Recruit Women Under Agnipath Scheme)

Indian navy jobs
गुजराती अग्निपथ योजनेला विरोध करत नाहीत, अभिनेत्याच्या ट्विटवर लोक संतापले

नौदलात अग्निपथ योजनेबाबत (Agnipath Scheme) भेदभाव नसेल. जसे आम्ही बोललो, ३० महिला अधिकारी या सध्या युद्धनौकांवर तैनात आहेत. आम्ही ठरवले आहे, आता वेळ आली की महिला खलाशींची भरती करणे, सर्व विभागात महिला असतील, असे व्हाईस अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी रविवारी म्हणाले. १४ लाखांच्या लष्करी सैन्यात महिलांचा १९९० वर्षापासून समावेश होऊ लागला. मात्र २०१९-२० मध्ये त्या अधिकारी होत्या. ७० हजार अधिकाऱ्यांच्या केडरमध्ये महिलांची संख्या केवळ तीन हजार ९०४ (लष्कारात १,७०५, वायुदलात १,६४० आणि नौदलात ५५९) होती.

Indian navy jobs
पंकजा मुंडेंनी स्वतःचा पक्ष काढल्यास; खासदार जलिल यांचं मोठं विधान

या व्यतिरिक्त ९ हजार अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. सध्या १०० महिला जवान लष्करात (CMP) आहेत. २०१९-२० मध्ये पहिल्यांदाच 'अदर रँक्स' अंतर्गत महिलांची भरती सुरु झाली. १९९ पेक्षा अधिक सीएमपी महिलांची गेल्या दोन वर्षांमध्ये भरती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.