सीआरपीएफच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला; ३ जवान शहीद

Naxal attack CRPF convoy; 3 soldiers died
Naxal attack CRPF convoy; 3 soldiers diedNaxal attack CRPF convoy; 3 soldiers died
Updated on

नवी दिल्ली : छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील नौपाडा येथे मंगळवारी (ता. २१) सीआरपीएफचे (CRPF) जवान रस्ता बांधणाऱ्या लोकांना सुरक्षा देत असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याती तीन जवान शहीद झाले आहेत. मृतांमध्ये दोन साहाय्यक उपनिरीक्षक आणि एका जवानाचा समावेश आहे. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले आहेत. (Naxal attack CRPF convoy; 3 soldiers died)

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सीआरपीएफची टीम ओरिसाच्या नौपाडा जिल्ह्यात रस्ते बांधणीचे काम करीत असलेल्या लोकांना सुरक्षा पुरवण्यासाठी निघाली होते. मात्र, घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी सुधारित आणि क्रूड बॅरल ग्रेनेड लाँचर्सने हल्ला केला, असे अधिकाऱ्यांनी सुरुवातीच्या माहितीचा हवाला देऊन सांगितले.

यापूर्वी एकदा छत्तीसगडमध्ये वर्षभरापूर्वी विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये २२ जवान शहीद झाले होते. त्यानंतर २०० ते ३०० नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. नक्षलवादी कमांडर हिडमाला पकडण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान गेले होते. मात्र, घात लावून बसलेल्या नक्षलवाद्यांनी तीन बाजूंनी जवानांवर हल्ला केला. नक्षलवाद्यांनी गोळीबारही केला व रॉकेट लाँचरही सोडले होते. तसेच धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता.

नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून काढला पळ

एएसआय शिशुपाल सिंग, एएसआय शिव लाल आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र कुमार सिंग अशी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

Naxal attack CRPF convoy; 3 soldiers died
मधुचंद्रानंतर पत्नीने पतीला म्हटले नपुंसक; मग घडला हा प्रकार...

सोमवारी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

सोमवारी (ता. २०) मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सुरक्षा दलांनी चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. तिघांवरही एकूण ३० लाखांहून अधिक रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये महिलेचाही समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.